पुणे-
आज आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधुन, आयकिया फाऊंडेशन आणि लीला पुनावाला फाऊंडेशने मुलींचे शिक्षण व सबलीकरणासाठी एकत्र पुढे येत एका नवीन भागीदारीची घोषणा केली आहे, ज्यात आयकिया ने २.९ दशलक्षची मदत करण्याची देखील घोषणा केली आहे. ह्यामुळे मुलींना शिक्षणाबरोबर त्यांना आत्मविश्वासु आणि आर्थिकदृष्या सक्षम बनवण्यासाठी मदत मिळेत. ह्यात शिष्यवृत्तीखेरीज, विविध प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी देखील निधी दिला जाईल. ज्यात नोकरी आणि अॅप्टिट्यूडच्या प्रशिक्षणाचा देखील समावेश असेल. ह्याच्या मदतीने शिक्षणाबरोबरच मुलींच्या व्यवहारिक ज्ञानात देखील भर पडेल. आयकेईएच्या ह्या पुढाकारातुन सध्या 4000 मुलींना मदत केली जाते. ह्या अंतर्गत अमरावती आणि वर्ध्याच्या पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थिनींना मदत केली जाते. आयकिया फाउंडेशन आणि एलपीएफ च्या ह्या भागीदारीची सुरवात २०११ मध्ये झाली. ज्यात निवडक पदवी आणि पदव्युत्तर मुलींना मदत केली जात आहे.
ह्या उपक्रमा अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल पाश्वभूमी असलेल्या मुलींना मदत केली जाते. ज्याता मोठ्या कुटुंबाती दुर्लक्षीत, विभक्त कुटुंबाती, अनाथ, एक पालक आसलेल्या आणि ग्रामीण भागातील नैसर्गिक आपत्ती बाधित मुलींचा सामावेश आहे. ह्या बहुसंख्य गरीब शेतकरी कुटुंबातील मुली आहेत. दुर्बल आर्थिक स्थितीमुळे बर्याचश्या मुली शिक्षण घेऊ शकत नाहीत, परंतु आता आयकियाच्या समर्थनामुळे ह्या मुलींना चांगले शिक्षण मिळत आहे. ह्यातील बहुतांश मुली अश्या कौटुंबिक पार्श्वभुमीतुन आहेत जेथे 1.50000 रूपए वार्षीक उत्पन्न असते. परंतु शिक्षण घेऊन ह्याच मुली वार्षीक 2.50000-500000 रूपए कमवतात. ह्याचबरोबर त्या आर्थिक दृष्या सक्षम आणि आत्मविश्वासी बनतता. ह्याचेच एक उदाहरण म्हणजे आयकिया फाउंडेशन आणि लीला पुनावाला फाऊंडेशनच्या मदतीने २०१२ मध्ये अस्मिता पाटील ह्या शेतकरी कुटुंबातील मुलीचे व्हिसा बैंगलोर मध्ये प्लेसमेंट झाले आणि तीला 13 लाखांचे पॉकेज मिळाले आहे.
लीला पुनावाला फाउंडेशन च्या अध्यक्षा, पद्मश्री सौ लीला पुनावाला म्हणाल्या, अनुदानाच्या मदतीने मुलींना शिक्षण पूर्ण करण्याची संधी तर मिळतेच पण ह्या बरोबर त्यांना अन्य प्रकारचे प्रशिक्षण देखील दिले जाते. ज्यात मदतीने त्या स्वहिताबरोबरच समाजव्यवस्था सक्षम बनवण्यात देखील योगदान देतात. देश हितासाठी मुलींमध्ये होणारे हे सकारात्मक बदल आवश्यक आहेत.
आयकिया फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी हेग्गेन्स म्हणाल्या, महिला शिक्षण हा समाज उन्नतीचा एक शक्तिशाली घटक आहे. शिक्षणाने महिलेचा विकास तर होतोच ह्याचबरोबर अनुषंगाने तिची मुले,कुटुंब आणि समाजात देखील अग्रेसर बदल घडतात. लीला पुनावाला फाऊंडेशनच्या शिष्यवृत्तीमुळे मुलींचे संपुर्ण आयुष्यच बदलताना पाहणे माझ्यासाठी खुप आनंदाची गोष्ट आहे. 21 वर्षेंपासुन लीला पुनावाला फाऊंडेशन हे मुलींचे शिक्षण व सबलीकरणाचा समानार्थी शब्दच बनला आहे. १९९६ साली जेंव्हा लीला पुनावाला फाऊंडेशनने शिष्यवृत्तीची सुरवात केली तेंव्हा भारतातील २० हुशार व आर्थीक दृष्या वंचित पाश्वभूमी असलेल्या मुलींना शिष्यवृत्ती दिली गेली. जीचा आज मोठा विस्तार झाला आहे.