पुणे: शिक्षण, महिला सबलीकरण आणि मानवतेसाठी कार्य करणार्या लीला पुनावाला फाऊंडेशन ने अलीकडे एका रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. सीईएस चैतन्य इंग्लिश मिडियम स्कूल( टूमारो टूगेदर प्रकल्पाअंतर्गत एलपीफ ह्या शाळेस सहायता करते) येथे आचार्य आनंदऋषि बल्ड बॉंंक च्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडले.
नेहा बनकर, प्रिया ताकवले, श्रेया सरडे आणि मृदुला देव यांनी ह्या उपक्रमाचे आयोजन केले होते. प्रामुख्याने इतरानां मदत करण्याच्या सकारात्मक भावनेबरोबरच रक्तदानाबाबत समाजामध्ये जागृकता घडवूण आणणे हा ह्या शिबिरामागिल मुख्य उद्येश्य होता. रक्तदानामुळे एखाद्या व्यक्तिची रक्ताची गरज पूर्ण होऊन त्याला जणुकाही एक नवीन आयुष्यच मिळत असते .
ह्या शिबिरामध्ये लीला गर्ल्स, लीला फोलोज, फाऊंडेशनचे सदस्य आणि फाउंडेशनच्या मित्र परिवाराचा सक्रिय सहभाग दिसून आला. ह्या प्रसंगी आपले विचार व्यक्त करताना श्री आणि सौ पुनावाला म्हणाले की, आम्ही आमच्या भावना शब्दात व्यक्त करू शकत नाही. राक्तदान शिबिर आयोजीत करून आम्ही आमचे समाजीक कर्तव्य जोपासत आहोत. ह्या शिबिरामध्ये एेच्छिक रक्तदान कारणार्या रक्त दात्यांचे आम्ही प्रचंड आभारी आहोत.

