- पुणे, पूनावाला फाउंडेशनच्या ११५ लीला सिनीअर्सनी त्यांच्या स्वप्नांकडे एक पाऊल टाकले आहे. ६ शाळांमधील ११५ लीला सिनीअर्सना शिष्यवृत्ती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा समारंभ नूर-अल-बसम हाॅल, अंजूमन-इ-इस्लाम काॅम्प्लेक्स, पुणे येथे पार पडला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून क्लबच्या माजी अध्यक्षा व महिला रोटरी क्लब (रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१) च्या संचालिका गौरी शिकरापूरकर उपस्थित होत्या.
ज्या मुलींनी दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे आणि आॅटो स्काॅलरशिपसाठी अर्ज केला होता त्या मुलींना शिष्यवृत्ती देण्यात आली. यामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी (काॅम्प्युटर, इ अॅण्ड टीसी, आयटी), डिप्लोमा इन इंजिनिअरींग, द्वितीय वर्ष इंजिनिअरींग, फार्मसी आणि नर्सींग आदी क्षेत्रातील विद्यार्थीनींचा समावेश आहे. फाऊंडेशनतर्फे केवळ शिष्यवृत्तीच दिली जात नाही तर प्लेसमेंट वेळी योग्य मार्गदर्शन देखील केले जाते.
नुकत्याच झालेल्या शिष्यवृत्ती प्रदान सोहळ्यात ३६१ ज्युनिअर्सना शिष्यवृत्ती देण्यात आली. पुणे, अमरावती आणि वर्धा येथील मुलींचा यामध्ये सहभाग आहे.यावर्षी १ हजार मुलींना शिष्यवृत्ती प्रदान करण्याचे ध्येय आहे.
महिला सबलिकरण आणि शिक्षणाचे महत्त्व यावर शिकरापूरकर यांनी भाष्य केले. त्या म्हणाल्या,”मुलींना आर्थिकदृष्ट्या स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी शिक्षण फार म्हत्वाचे आहे. त्यांनी सर्व लीला फेलोजना पुढिल शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.”
पद्मश्री लीला पूनावाला म्हणाल्या,”या मुलींना फाऊंडेशकडून स्वावलंबी आणि जबाबदार नागरीक म्हणून जेव्हा घडविले जाते तेव्हा त्यांच्या पालकांनी लग्नाची घाई न करता आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनण्यासाठी साह्य केले पाहिजे. तसेच ‘टुमारो टुगेदर’ या स्कूल प्रोजेक्ससाठी साह्य करणारे बील्टेमाफाऊंडेशनचे आभार मानले.”
यावेळी पालक, विश्वस्त, समिती सदस्य, कर्मचारी सदस्य, मार्गदर्शक, १९ शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक आदी उपस्थित हो
लीला पूनावाला फाउंडेशनकडून ११५ लीला सिनीअर्सना शिष्यवृत्ती
Date: