मुंबई – जिवाची मुंबई ..नुसती जिवाचीच नाही तर जिवाभावाची मुंबई वाटेल अशी १ घटना या बातमी द्वारे आम्ही मांडतो आहे … दादरच्या एका शाळेतील विद्यार्थी ३५ वर्षांनी एकत्र आले अन लातूर या दुष्काळग्रस्त शहराच्या एका रुग्णालयाच्या मदतीला धावून गेले … होय या रुग्णालयाला पिण्याच्या थंड पाण्याचा पुरवठा किमान २ महिने करण्याचा निर्धार केला आणि महाराष्ट्र दिनी तो अंमलात आणला देखील …
महाराष्ट्रातील भीषण दुष्काळाच्या बातम्या आपण वाचतच आहोत पण प्रत्यक्ष इच्छा आसुनही आपण काही करु शकतो का…हि खंत उराशी बाळगून ..याच प्रेरणेने “राजा शिवाजी विद्यालयातील (दादर, मुंबई) Batch-1979″ चे विद्यार्थी पस्तीस वर्षांनी एकत्र आले…सामाजिक बांधिलकी म्हणुन मराठवाडा लातुर येथील येथिल दुष्काळी परिस्थितीचा अभ्यास केला.तेथिल हाँस्पिटल मध्ये पाण्याअभावी आँपरेशन रद्द केली जात आहेत…लहान मुलांच्या वार्डमध्ये दुध तयार करण्यासाठी पाणी मिळणेही मुश्कील…तेथिल डॉक्टरांची हतबल परिस्थिती..नातेवाईकांची ससेहोलपट…स्थानिक रहिवाश्यांची पाण्यासाठी चाललेली धडपड ..हि दारूण परिस्थिती लक्षात घेऊन पस्तीस वर्षांनी एकत्र आलेल्या ह्या मित्रांनी”राजा शिवाजी विद्यालय-Batch-1979” या नावाखाली तेथिल सिव्हील हॉस्पिटल मध्ये”थंड शुद्ध पाण्याच्या पुरवठ्याची व्यवस्था सुरु केली.या उपक्रमास डॉक्टर्स..बपेशंटचे नातेवाईक…व स्थानिक रहिवाशी यांचा प्रत्यक्ष सहभाग व प्रतिसाद मिळत आहे.समाजाचे आपणही काही देणं लागतो या भावनेने या दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाऊन आपल्या सेवेचा हा खारीचा वाटा ह्या विद्यार्थ्यांनी उचलुन जो उपक्रम सुरु केला आहे तो अभिमानास्पद आहे..
या उपक्रमात अजय प्रभाकर कांबळी, सुनील सावंत, नितीन शिरसाट, संजय सावंत, योगेंद्र जोशी, अभिजित फडके, राजेश शानभाग या विध्यार्थ्यांचा विशेष सहभाग आहे…
तसेच लातूरचे राजेश माने व निखिल चित्ते या उपक्रमाचा स्थानिक पातळीवर पाठपुरवठा करीत आहेत…..
या विद्यार्थ्यांचे हार्दिक आभार…
…आणि सलाम त्यांच्या कार्याला





