Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

रात्री इम्रान सरकार 174 विरुद्ध 0 मतांनी कोसळले ,नवे होणारे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले, काश्मीर प्रश्नावर ठोस तोडगा निघेपर्यंत भारतासोबतचे संबंध सुधारणार नाहीत

Date:

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे खुर्ची वाचवण्याचे सर्व प्रयत्न अखेर फसले. नॅशनल असेंब्लीत रात्री १२.३२ वाजता अविश्वास प्रस्तावावर मतदान झाले आणि १२.५८ वाजता इम्रान सरकार १७४-० मतांनी पडले. आता सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार रविवारी दुपारी संसदेची बैठक होत असून यात शाहबाज शरीफ यांची नवे पंतप्रधान म्हणून निवड होईल.एमएल-एन नेते शाहबाज शरीफ यांनी विरोधकांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांचे आभार मानले. इम्रान यांच्या पीटीआय पक्षाच्यावतीने माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी उमेदवारी दाखल केली आहे.

दरम्यान तत्पूर्वी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार नॅशनल असेंब्लीचे कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्तावावर मतदान घेण्याची मागणी केली. तर, सत्ताधारी पक्षाचे सर्व खासदार सभागृहाबाहेर पडले. यानंतर इम्रान यांनी हे सरकार पाडण्यामागे कट असल्याचे सांगत अमेरिकी वकिलातीचे एक पत्र सभापतींकडे सोपवले. मात्र, रात्री ११ वाजता सरन्यायाधीश सुप्रीम कोर्टात दाखल होताच इकडे सभापती असद कैसर आणि उपसभापती कासिम सुरी यांनी राजीनामे दिले.

इम्रान खान आपले सरकार वाचवण्यात अपयशी ठरले असून मतदानादरम्यान एकूण 342 खासदारांसह 174 सदस्य उपस्थित होते. सर्वांनी इम्रान खानच्या विरोधात मतदान केले. पाकिस्तान मुस्लिम लीग-एनचे अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ आता पाकिस्तानचे नवे पंतप्रधान होणार आहेत. 2018 मध्ये, नवाझ शरीफ यांना पदावरून अपात्र ठरवल्यानंतर शाहबाज शरीफ यांना पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझचे अध्यक्ष बनवण्यात आले होते.

कोण आहेत शाहबाज?
शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे भाऊ आहेत. 2018 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पीएमएल-एनने शाहबाज यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले होते. इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ या निवडणुकीत विजयी झाला. त्याचवेळी शाहबाज यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. शाहबाज पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत.

रात्री 12:10 वा.- नॅशनल असेंब्लीचे स्पीकर असद कैसर आणि डेप्युटी स्पीकर कासिम सुरींनी राजीनामा दिला.

12:12 वा.- पीएमएलएनचे अयाज सादिक यांच्याकडे स्पीकरची जबाबदारी दिली. असेंब्लीचे कामकाज सुरू.

12:14 वा.- इम्रान समर्थक खासदार असेंब्लीतून बाहेर पडले.

12:15 वा.- इम्रानविरुद्ध अविश्वास प्रस्तावावर मतदान सुरू झाले.

12:30 वा.- मतदान सुरू. पाकच्या वेळेनुसार तारीख बदलल्यामुळे दोन मिनिटांसाठी प्रक्रिया रोखण्यात आली.

12:32 वा.- कामकाज सुरू. नॅशनल असेंब्लीच्या बाहेर इम्रान समर्थक जमले. लष्कर रस्त्यांवर उतरले. सभागृहाबाहेर कैद्यांना घेऊन जाणारी वाहने आणली. सर्व विमानतळांवर हाय अलर्ट. देशातील कुठलाही नेता वा अधिकारी एनओसीशिवाय देश सोडू शकणार नाही.

शाहबाज म्हणाले, नवी पहाट झाली

इम्रान यांची गच्छंती झाल्यानंतर पाकच्या पंतप्रधानपदी शाहबाज शरीफ यांची नियुक्ती होणार आहे. त्यांनी आपले मोठे बंधू नवाज शरीफ यांची आठवण काढत आता पाकच्या भवितव्याची नवी पहाट झाल्याची भावना व्यक्त केली. दुसरीकडे, पीपीपी नेते बिलावल भुट्टो यांनी म्हणाले -तुम्हा सर्वांना जुन्या पाकिस्तानच्या शुभेच्छा. इम्रान यांनी नव्या पाकचा नारा देत देशाचे सत्ताशिखर गाठले होते. त्यानंतर बिलावल यांनी जुन्या पाकच्या शुभेच्छा देत इम्रान यांचा चिमटा काढला.

  • उमेदवारी अर्ज भरल्यानंतर शाहबाज म्हणाले -नवाज शरीफ यांच्याविरोधातील खटले कायद्यानुसार चालतील.
  • काश्मीर प्रश्नावर ठोस तोडगा निघेपर्यंत भारतासोबतचे संबंध सुधारणार नाहीत.
  • सरकारविरोधात विरोधकांची मोट बांधणाऱ्या मौलाना फजल उल रहमान यांनी इम्रान यांचा उल्लेख नकलाकार म्हणून केला. तसेच जनतेला सत्ता परिवर्तनाच्या शुभेच्छा दिल्या.
  • नवा पंतप्रधान निवडण्यासाठी सोमवारी दुपारी 2 वाजता अधिवेशन सुरू होणार आहे.
  • इम्रान ज्या गुप्त पत्राचा दाखला देत होते, त्या प्रकरणी आता इस्लामाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर लवकरच सुनावणी होईल.
  • इस्लामाबादेत लष्कर तैनात करण्यात आले आहे. देशातील कोणताही नेता किंवा अधिकाऱ्याला यापुढे NOC शिवाय देशाबाहेर जाता येणार नाही.
  • कायदेतज्ज्ञांनी माजी सभापती असद कैसर व उपसभापती कासिम सुरी या दोघांवरही न्यायालयीन अवमाननेची कारवाई होईल.
  • पाक संसदेचे अधिवेशन सुरू असताना इम्रान आपल्या बनीगाला निवासस्थानी होते. रात्री लष्करप्रमुख जनरल बाजवा व आयएसआय प्रमुख जनरल नदीम अंजुम यांनी त्यांची भेट घेतली.
  • मरियम यांनी इम्रान यांच्यावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, पाकचे वाईट स्वप्न संपले. आता जुन्या जखमा भरण्याची वेळ आहे.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मद्यतस्करी :18 लाखाचा मुद्देमाल जप्त,3 गजाआड

पुणे :दारूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती ...

महावितरणचे संचालक राजेंद्र पवार ‘दिव्यांग भूषण 2025’ पुरस्काराने सन्मानित

नागपूर, दि. 9 डिसेंबर 2025: महावितरणमधील दिव्यांग अधिकारी आणि...

२०२६ साठी २४ दिवसांच्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर; ‘भाऊबीजे’ला अतिरिक्त सुट्टी

मुंबई, दि. ९: महाराष्ट्र शासनाने २०२६ या वर्षासाठी राज्यातील सर्व...

लोकमान्यनगरच्या पुनर्विकासासाठी — ११ डिसेंबरला ‘घंटानाद आंदोलन’

 नागपुरातील अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकमान्यनगरचा आवाज बुलंद करण्याची तयारी —...