Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

ग्लोबल कोकण परिषदेच्या माध्यमातून कोकण आणखी समृद्ध होईल- विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर

Date:

मुंबई, दि. २७ मार्च – कोकणात काहीही होत नाही, होणार नाही, अशा विचारांनी मी स्वतः वैफल्यग्रस्त झालो होतो. आपण हा दीपस्तंभ तेवत ठेवलेला आहात. येणाऱ्या काळात निश्चितच या सगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण जे अभियान घेतलंय त्यातून कोकण आणखी समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला.
ग्लोबल कोकण उद्योग परिषद तर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर बोलत होते. ते पुढे म्हणाले की,
कार्यक्रमाचे संयोजक संजय यादवराव यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. एखादा विषय १५-२० वर्षे सातत्याने लावून धरणे म्हणजे ध्येयवेडा काय असू शकतो, कोकणविषयी आपली आत्मीयता, यातून दिसून येते. कोकणची उद्योजकता वाढली पाहिजे. मी गेली १५ वर्षे बघयोय, तेच तेच विषय. आंब्याचे उत्पादन वाढले पाहिजे, शेतकऱ्याना आणून फाईव्ह स्टार हॉटेलला सन्मान करायचा. रिसॉर्ट चालवतायत, पर्यटनात काम करतायत, पाण्यात कोण काम करतोय, आदिवासींसाठी काम करतोय, त्यांना सन्मानित करायचे. अशा प्रकारच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून माझ्या कोकणची समृद्धी कशी होईल, हा एकच ध्यास घेऊन संजय यादवराव काम करतायत. कार्यक्रम करणे, चळवळ चालवणे हे किती अवघड असते हे कार्यकर्ता म्हणून मला माहीत आहे.
दरेकर पुढे म्हणाले की, कोकणचे माझे नाते जिव्हाळ्याचे नाते आहे. विधिमंडळाच्या सभागृहात असे एकही माझे भाषण नाही की ज्यात कोकणविषयी मी बोललो नाही. ज्या वेळेला अर्थसंकल्पावर माझे भाषण होते, विरोधी पक्षनेता म्हणून, त्या वेळेला मी सरकारला सांगितले, ज्या कोकणाने तुम्हाला भरभरून दिले त्या कोकणावर अर्थसंकल्पात अन्याय झाला आहे. माझा अंतिम आठवडा प्रस्ताव होता त्याही प्रस्तावात मी प्रादेशिक असमतोल हा विषय घेतला आणि आमच्या कोकणावर गेली ४०-५० वर्षे कसा अन्याय झालाय हे मी सभागृहात सांगितले. केवळ हे सांगून थांबलो नाही तर कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी पर्यटनासाठी ५ कोटींचे पॅकेज द्या, असे सांगितले. कोकणच्या आंबा उत्पादकांना, मासेमारी करणाऱ्या मच्चीमार बांधवाला शेतकऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे, अशी मागणी केली. कोकणच्या उर्वरित कोकण विकास महामंडळाने कोकणचे कोकण वैधानिक विकास महामंडळ स्थापन करावे, हीही मागणी केल्याचे दरेकर यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला आमदार रवींद्र फाटक, रवींद्र प्रभुदेसाई अध्यक्ष पितांबरी प्रोड्युसर प्रा. लि. आदी मान्यवर उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन

पुणे : ज्येष्ठ समाजवादी नेते आणि कामगार आणि कष्टकरी...

नाताळ सण सर्वधर्मीयांसह सिटी चर्च येथे साजरा करण्याची परंपरा

नाताळ सण सर्वधर्मीयांसह सिटी चर्च येथे साजरा करण्याचा...