कोंढवा :अनिल चौधरी
कोंढवा गावातील संकट हरण मंदिरामध्ये महाशिवरात्र उत्साहात संपन्न झाली . महादेवाच्या दर्शनासाठी शिवमंदिरांमध्ये भाविकांच्या रांगा लागल्या होत्या .
कोंढवा येथील संकट हरण महादेव मंदिर म्हणजे जागृत देवस्थान आहे .त्यामुळे इथे बाराही महिने भाविकांची गर्दी असते. पण आज महाशिवरात्रीच्या निमित्ते इथे भाविकांची नेहमीपेक्षा जास्त गर्दी आहे. वाराणसी गंगाघाटावर महाशिवरात्रीनिमित्त पहाटे आरती करण्यात आली.
देशभरात शिवमंदिरांमध्ये आणि महत्त्वाच्या शिवस्थानांमध्ये शिवभक्तांची रिघ पाहायला मिळतेय. पहाटेपासूनच महादेवांच्या दर्शनासाठी भक्त आलेत. त्याचबरोबर, राज्यातील भिमाशंकर, रामलिंग, हरिहरेश्ववर, त्रंबकेश्वर, घृष्णेश्वर, कल्याणेश्वर या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली आहे. दरम्यान, देशभरात महाशिवरात्र मोठ्या उत्साहाने साजरी केला जात असून भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. महाशिवरात्रीनिमित्त शुभेच्छाचा वर्षाव भाविकांवर पडत आहे . कोंढवा परिसरातील शिवमंदिरात मोफत फराळ वाटपाचे कार्य सुरु आहे . मंदिरामध्ये भजन कीर्तन सुरु आहे . महिलांची लक्षणीय उपस्थिती आहे . या ठिकाणी माजी नगरसेवक तानाजी लोणकर , अनिकेत लोणकर , अक्षय लोणकर , संतोष गोरड , गणेश लोणकर , प्रशांत लोणकर ,लक्ष्मण लोणकर , नितीन लोणकर , गणेश दिक्षित , राजू लोणकर , नगरसेवक भरत चौधरी , महादेव बाबर , योगेश खिवंसरा, अमर पवळे , तसेच कोंढवा खुर्द ग्रामस्थ तसेच परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .


