मैफिल अलिबागतर्फे कोजागरी विशेष कार्यक्रम

Date:

पुणे-

मैफिल अलिबागतर्फे कोजागरीच्या निमित्ताने शनिवार ८ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजता आरसीएफ च्या कुरुळ वसाहतीमध्ये विख्यात गायक आदित्य मोडक यांचा उपशास्त्रीय, नाती आणि भक्तिगीत गायनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

मैफिल, अलिबाग ही संस्था अलिबाग परिसरात गेली तीस वर्ष दर्जेदार संगीताचे देखणे कार्यक्रम आयोजित करणारी संस्था म्हणून परिचित आहे. अलिबागसह रोहा, पेण, मुरुड, रेवदंडा तालुक्यापर्यन्त सभासद वर्गाचे क्षेत्र पसरलेली ही संस्था गेली तीस वर्षे सातत्याने अभिजात संगीताचे कार्यक्रम आयोजित करीत आहे. दरवर्षी साधारणपणे फेब्रुवारीत दोन दिवसीय संगीत महोत्सव, जुलै – ऑगस्ट मध्ये एक कार्यक्रम आणि कोजागरीचा कार्यक्रम याप्रमाणे संस्थेच्या कार्यक्रमांचे वेळापत्रक असते. दरवर्षी कोजागरी पौर्णिमेच्या दरम्यान वैविध्यपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनाची परंपरा याही वर्षी कायम ठेवत संस्थेने आदित्य मोडक या आश्वासक युवा कलाकाराची सांगीतिक मैफिल आयोजित केली आहे. नुकत्याच झालेल्या व्हीनस येथील आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये बेस्ट स्क्रीन प्ले पुरस्कार मिळविलेल्या चैतन्य ताम्हाणे यांच्या द डिसायपल चित्रपटातील नायकाच्या भूमिकेमुळे चर्चेत असलेला आदित्य मोडक हा मुळात उत्कृष्ट गायक आहे. ग्वाल्हेर गायकीचे सध्याच्या काळातील अध्वर्यू मानले जाणारे पं डॉ राम देशपांडे यांच्याकडे आदित्य मोडक शास्त्रशुद्ध गायकीचे धडे घेत आहे. गायनाचे प्राथमिक शिक्षण त्याने चंद्रकांत पारकर व प्रदीप धोंड यांच्याकडून बालपणापासून घेतले आहे. गांधर्व महाविद्यालय मिरज येथून विशेष योग्यतेसह संगीत विशारद तर प्रथम श्रेणीत संगीत अलंकार पदवी प्राप्त केली आहे. त्याची शैक्षणिक पार्श्वभूमीदेखील तितकीच उल्लेखनीय आहे. वाणिज्य शाखेचा स्नातक असलेला आदित्य लेखा परीक्षकाची (सीए)ची अवघड परीक्षा पहिल्या प्रयत्नात पास झाला होता. मात्र गाण्यावरील प्रेमापोटी प्रतिष्ठित बहुराष्ट्रीय कंपनीतील वित्त विभागातील उच्च पदावरील नोकरी सोडून तो आता पूर्णपणे गायनासाठी वेळ देत आहे. शास्त्रीय गायनासाठीचे विष्णु दिगंबर पलुस्कर पुरस्कार, युत फेस्टिवल मधील तीन सुवर्णपदके, सवाई गंधर्व शिष्यवृत्ती सारखे प्रतिष्ठित पुरस्कार गाठीशी असलेल्या आदित्यने देशभरातील बहुसंख्य नामांकित सगीत महोत्सवात आपले गायन सादर करून जाणकारांची वाहवा मिळविली आहे.

ग्वाल्हेर गायकीचा हा युवा आश्वासक कलाकार मैफिलच्या कोजागरी विशेष कार्यक्रमात उपशास्त्रीय गायना सोबत लोकप्रिय नाट्यगीते आणि अभंगरचना सादर करणार आहे. या कार्यक्रमात त्याला संवादिनीवर सुधांशु घारपुरे व तबल्यावर विनय मुंढे हे गुणी कलाकार साथ संगत करणार आहेत. अलिबाग येथील रायझिंग फॅसिलिटी मॅनेजमेंट या सुविख्यात हाऊस किपिंग व्यवसायाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचा आस्वाद अलिबाग परिसरातील संगीतप्रेमी रसिकांनी घेऊन कोजागरी पौर्णिमेचा आनंद द्विगुणित करावा असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात येत आहे.

(by Sharad Lonkar)

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुंबईत राष्ट्रवादी शरद पवार गटाचा महायुतीला पाठिंबा, 11 फेब्रुवारीला नव्या महापौरांची निवडणूक

मुंबई- महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे....

शहराचं बदलणार रूप … शहर परिवर्तन कक्षाची बैठक संपन्न.

पुणे- वाढता शहरच्या वाढत्या समस्यांना फक्त तोंड द्यायचे नाही...

कर्नाटक पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने पुण्यात देशांतर्गत पर्यटन बी 2 बी रोड शोचे आयोजन

पुणे, 5 फेब्रुवारी 2026 केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने, त्यांचे प्रादेशिक...