‘के के आय इन्स्टिट्यूट’ला आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या नेत्रतज्ज्ञांच्या स्वागताचा, तसेच या ज्ञानसत्र व्यासपीठाच्या यजमानपदाचा मान
पुणे: नेत्ररुग्णांची सुरक्षा जपण्याप्रती, तसेच त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सेवा किफायती दरांत मिळवून देण्याप्रती कटिबद्ध असलेल्या येथील ‘के के आय इन्स्टिट्यूट’ला नेत्रचिकित्सेतील ज्ञानसत्रांचे व्यासपीठ ठरण्याचा बहुमान मिळाला आहे. नेत्रचिकित्सेतील जागतिक तंत्रज्ञान, प्रथा व सेवा वितरण राबवण्यासाठीचे नेत्र सुरक्षा केंद्र म्हणून या संस्थेची न्यू यॉर्कच्या ‘मॅनहॅटन आय, इयर अँड थ्रोट हॉस्पिटल’मधील डॉ. अमिलीया श्रीयर, एमडी ऑप्थॅल्मॉलॉजी, व ‘डाऊनस्टेट ऑप्थॅल्मॉलॉजी असोसिएट्स’चे डॉ. एडवर्ड एफ स्मिथ, एमडी, ऑप्थॅल्मॉलॉजी या तज्ज्ञांकडून निवड करण्यात आली आहे.
पुण्याच्या कोरेगाव पार्क परिसरात स्थित ‘के के आय इन्स्टिट्यूट’ने सुपर स्पेशॅलिटी आयकेअर क्षेत्रात सेवेचा जागतिक दर्जाचा मापदंड राखला असून आता या संस्थेला अमेरिकेतील वर उल्लेख केलेल्या आघाडीच्या नेत्रचिकित्सकांच्या स्वागताचा, तसेच त्यांच्या ज्ञानसत्रांचे व्यासपीठ म्हणून यजमानपदाचा बहुमान मिळाला आहे. डॉ. अमिलीया श्रीयर व डॉ. एडवर्ड स्मिथ यांना अनुक्रमे कॉर्नियाचे विकार व न्युरो-ऑप्थॅल्मॉलॉजी या क्षेत्रांतील २५ वर्षांहून अधिक अनुभव आहे. या दोघा नेत्रतज्ज्ञांनी संबंधित विषयांतील कौशल्य वर्धनासाठी गेले तीन दिवस (२७ फेब्रुवारी ते १ मार्च २०१७) ‘के के आय इन्स्टिट्यूट’ला भेट दिली आणि नेत्रचिकित्सेतील अद्ययावत प्रगती, तसेच गुंतागुंतीच्या नेत्ररोगांचा इलाज या विषयांवर कल्पनांची देवाण-घेवाण करणारी ज्ञानसत्रे घेतली.
यासंदर्भात डॉ. अमिलीया श्रीयर म्हणाल्या, की गेले तीन दिवस आम्ही ‘के के आय इन्स्टिट्यूट’ला भेट देऊन येथील उत्कृष्ट शल्यविशारद, डॉक्टर, तंत्रज्ञ, ऑप्टोमेट्रिस्ट, नेत्रतज्ज्ञ यांच्या सहवासाचा अविस्मरणीय आनंद घेतला. वर्षाला हजारो नेत्ररुग्णांवर यशस्वी उपचार करणे, रुग्णांप्रती स्नेहभाव ठेऊन त्यांना अजोड शुश्रूषा सेवा देणे, नेत्रचिकित्सेतील ज्ञान व कौशल्य सातत्याने अद्ययावत करणे या गुणांमुळेच ही संस्था रुग्णांना सर्वोत्तम शुश्रूषा पुरवणारी ठरली आहे. येथील डॉक्टरांच्या तपासणी साधनांपासून ते शस्त्रक्रिया दालनांपर्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा केला जाणारा वापर पाहाता अशा ठिकाणाला मी पुन्हा नक्कीच भेट देईन.
डॉ. एडवर्ड स्मिथ यांनीही या प्रतिक्रियेला दुजोरा दिला. ते म्हणाले, की गेले तीन दिवस आम्ही ‘के के आय इन्स्टिट्यूट’मधील कामकाज, शस्त्रक्रियेतील अचूकता, रुग्णसेवा, शिस्त अशा सर्व गोष्टींचे बारकाईने अवलोकन केले. त्यानंतर मी खात्रीपूर्वक सांगतो, की ही संस्था जगातील सर्वोत्तम नेत्रचिकित्सा व शुश्रूषा केंद्रांपैकी एक आहे. येथे उत्तम प्रशिक्षित व अनुभवी शल्यविशारद असून ते अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे नेत्रशस्त्रक्रिया करतात, हे बघणे आगळा अनुभव होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे येथे प्रत्येक रुग्णाला मनापासून, आपुलकीने आणि कुटूंबातील एक घटक मानून असाधारण अशी सेवा पुरवली जाते. या सेवेचा दर्जा उत्कृष्ट आहेच, परंतु त्यापेक्षाही ज्या पद्धतीने शुश्रूषा केली जाते ती अतुल्य आहे. जगभरात नेत्रसुरक्षा देणाऱ्या संस्थांसाठी ‘के के आय इन्स्टिट्यूट’ आदर्श प्रारुप आहे.
यासंदर्भात ‘के के आय इन्स्टिट्यूट’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेणू वाधवा म्हणाल्या, की डॉ. अमिलीया श्रीयर व डॉ. एडवर्ड स्मिथ यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या नेत्रतज्ज्ञांच्या स्वागताचा मान मिळाल्याबद्दल आम्हाला आनंद होत आहे. नीतिमत्ता, रुग्णांप्रती संवेदनशीलता व उपचारांत आधुनिक तंत्रज्ञान अवलंबून पुण्यातील नागरिकांना सर्वोच्च दर्जाची आरोग्य सुरक्षा मिळवून देण्याचा दृष्टीकोन आमचे संस्थापक रेव्ह. दादा जे. पी. वासवानी यांचा आहे. हे ज्ञानसत्र म्हणजे त्या दृष्टीकोनाशी सुसंगत राहून उचललेले आणखी एक पाऊल आहे. वैद्यकीय समुदायासाठी यापुढेही अशा अनेक संधी आम्ही उपलब्ध करुन देत राहू.