पुणे- ज्येष्ठ चित्रकार किशोर रणदिवे यांच्या कुंचल्यातून साकारलेल्या हिमालयातील चित्रांचे ‘हिमालयन ओडिसी’ हे प्रदर्शन १ ते ७ जुलै या कालावधीत भोसलेनगरमधील इंडियाआर्ट गॅलरीत भरविण्यात येणार आहे. सकाळी ११ ते रात्री ८ प्रदर्शनाची वेळ आहे.
रशियन चित्रकार निकोलस रोरीक यांची हिमालयावरील चित्रे जगभरात प्रसिध्द आहेत. त्या धर्तीवर रणदिवे यांनी चित्रांची मालिका साकारावी अशी सुचना इंडियाआर्टचे संचालक मिलिंद साठी यांनी दहा वर्षांपूर्वी केली होती. तेव्हापासून काढलेल्या चित्रांचा समावेश या प्रदर्शनात आहे.
हिमालयाची उत्तुंग, सुंदर, संरक्षक, संस्कृती आणि देवांचे वास्तव्य असणारी शिखरे कलाप्रेमींसाठी विशेष आकर्षण ठरतील. जलरंग आणि तैलरंग या माध्यमात कॅनव्हासवर चित्र काढण्यात आली आहेत. श्री. रणदिवे जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे माजी विद्यार्थी आहेत. सुप्रसिध्द चित्रकार शंकर पळशीकर आणि गजानन हळदणकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कलेचा अभ्यास पूर्ण केला.
हिमालयाचे सौंदर्य न्याहाळण्याची संधी
Date:

