पुणे – बालकांच्या प्रगतीसाठी प्ले स्कूलची भूमिका महत्त्वाची असल्याचे उद्गार पोलीस महानिरीक्षक रविंद्र कदम यांनी काढले. किड्झी या प्री-स्कूल नर्सरीच्या लोहगांव शाखेचे उद्घाटन रविंद्र कदम यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रविंद्र कदम यांच्यासह किड्झीचे बिझनेस पार्टनर अंकिता संचेती, रोशन संचेती, प्रदीप राठोड, उद्योगपती सुरेंद्र मित्तल. गौरी गोडबोले, लिटल मास्टर सचिन, मिसेस महाराष्ट्र शिल्पा ओझा, मिलिंद राऊळ आणि किड्झीच्या अॅकेडेमिक मॅनेजर विद्या उशासू हे उपस्थित होते.
अंकिता संचेती, रोशन संचेती व प्रदीप राठोड यांचे वाघोली नंतरचे हे दुसरे किड्झी केंद्र आहे. त्यांच्या ब्लॉसम अॅकॅडमीला किड्झीचा रायझिंग स्टार अॅवॉर्ड देण्यात आला होता. किड्झीला जास्तीत जास्त बालकांपर्यंत पोहोचवता यावे म्हणून त्यांनी एका वर्षात दुसरे किड्झी केंद्र सुरू केले आहे.
किड्झी ही नर्सरी शाळा २००३ पासून प्री-स्कूल शिक्षणक्षेत्रातील अग्रणी संस्था म्हणून ओळखली जाते. देशभरात किड्झीच्या १५०० पेक्षा जास्त शाखांमधून लहान मुलांंना उत्तम पद्धतीचे प्री-स्कूल शिक्षण दिले जाते. जगातील प्रत्येक बालक हा अद्वितीय असतो असे किड्झीला वाटते. त्यामुळे बालकाच्या बौद्धिक विकासावर लक्ष केंद्रीत करण्यावर किड्झी विशेष काम करते. यामध्ये बालकाला सर्वोत्तम शिक्षणासह योग्य ती माहिती, वाचन, लेखन तंत्रज्ञान यांसारखे विषय सोप्या पद्धतीने शिकवले जातात. पुणे, १५ एप्रिल २०१७ – बालकांच्या प्रगतीसाठी प्ले स्कूलची भूमिका महत्त्वाची असल्याचे उद्गार पोलीस महानिरीक्षक रविंद्र कदम यांनी काढले. किड्झी या प्री-स्कूल नर्सरीच्या लोहगांव शाखेचे उद्घाटन रविंद्र कदम यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रविंद्र कदम यांच्यासह किड्झीचे बिझनेस पार्टनर अंकिता संचेती, रोशन संचेती, प्रदीप राठोड, उद्योगपती सुरेंद्र मित्तल. गौरी गोडबोले, लिटल मास्टर सचिन, मिसेस महाराष्ट्र शिल्पा ओझा, मिलिंद राऊळ आणि किड्झीच्या अॅकेडेमिक मॅनेजर विद्या उशासू हे उपस्थित होते.
अंकिता संचेती, रोशन संचेती व प्रदीप राठोड यांचे वाघोली नंतरचे हे दुसरे किड्झी केंद्र आहे. त्यांच्या ब्लॉसम अॅकॅडमीला किड्झीचा रायझिंग स्टार अॅवॉर्ड देण्यात आला होता. किड्झीला जास्तीत जास्त बालकांपर्यंत पोहोचवता यावे म्हणून त्यांनी एका वर्षात दुसरे किड्झी केंद्र सुरू केले आहे.
किड्झी ही नर्सरी शाळा २००३ पासून प्री-स्कूल शिक्षणक्षेत्रातील अग्रणी संस्था म्हणून ओळखली जाते. देशभरात किड्झीच्या १५०० पेक्षा जास्त शाखांमधून लहान मुलांंना उत्तम पद्धतीचे प्री-स्कूल शिक्षण दिले जाते. जगातील प्रत्येक बालक हा अद्वितीय असतो असे किड्झीला वाटते. त्यामुळे बालकाच्या बौद्धिक विकासावर लक्ष केंद्रीत करण्यावर किड्झी विशेष काम करते. यामध्ये बालकाला सर्वोत्तम शिक्षणासह योग्य ती माहिती, वाचन, लेखन तंत्रज्ञान यांसारखे विषय सोप्या पद्धतीने शिकवले जातात.

