पुणे-कलाकारांनी महापालिकेकडे सुपूर्त केलेला राम गणेश गडकरी यांचा पुतळा आता तरी सन्मानाने बसवा अशी मागणी अभिनेते शरद पोंक्षे यांनी महापौर मुक्ता टिळक आणि स्थायीसमितीचे माजीअध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत कोथरूड नवरात्र महोत्सवाचा सत्कार स्वीकारताना केली .
अभिनेते शरद पोंक्षे यांचा त्यांच्या कार्याबद्दल व वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.यावेळी हेमंत बर्वे यांची संकल्पना आणि शरद पोंक्षे यांचे निवेदन असलेला स्वतंत्रते भगवती हा कार्यक्रम सादर करण्यात आला.या कार्यक्रमादरम्यान निवेदन करताना अभिनेते शरद पोंक्षे यांनी ” कलाकारांनी पुणे मनपा ला भेट दिलेला राम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा सन्मानाने स्थापित केला जावा अशी आग्रही मागणी मंडळी “. कोथरूड मध्ये गदिमांचे स्मारक उभे राहत आहे ही आनंदाची बाब असून ” स्मारक उभारताना पहिले त्याच्या सुरक्षेची व्यवस्था करावी अशी मार्मिक टिप्पणी ही त्यांनी केली.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली ते छत्रपती शिवाजी महाराज ते स्वातंत्र्यवीर सावरकर अश्या वंदनीय महापुरुषांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकतानाचाच त्यांच्यावरील गीतांनी व निवेदनातून उपस्थित रसिक भारावून गेले.
यावेळी नगरसेविका हर्षाली माथवड,नगरसेविका वासंतीताई जाधव व नगरसेविका छायाताई मारणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप खर्डेकर यांनी केले तर उपस्थितांचे स्वागत उत्सव प्रमुख विशाल भेलके व उमेश भेलके यांनी तर आभार प्रदर्शन नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी केले.

