संगीत खुर्ची खेळत महिलांनी दिला स्वच्छतेचा संदेश
स्वच्छता न राखल्याने सतत ड्रेनेज तुंबण्याची समस्या व त्यासाठी निधी खर्च होत असल्याने अन्य विकास कामे मागे पडतात – नगरसेविका मंजुश्री खर्डेकर….
पुणे-गोसावी वस्तीत सातत्याने ड्रेनेज तुंबल्याच्या तक्रारी येतात व प्रशासनाला आठवड्यातून एकदा तरी कुठ्ल्यान कुठल्या गल्लीत ड्रेनेज सफाईसाठी धाव घ्यावी लागते,तसेच दर वर्षी येथे ड्रेनेज लाईन साठी लाखो रुपये खर्च करावे लागतात व अन्य विकास कामांसाठी निधीच शिल्लक राहात नाही,पण तुम्ही जर स्वच्छता ठेवली तर ड्रेनेज ला घुशी पोखरणारी नाहीत व वस्ती ही सुंदर राहील असे मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.आता वस्तीत ५० लाख रुपयांची कामे ही फक्त ड्रेनेजची सुरु आहेत असे ही त्यांनी स्पष्ट केले.”नगरसेविका आपल्या भेटीला” या उपक्रमाअंतर्गत गोसावी वस्तीत स्वच्छता जनजागृती,कचरा बकेट वाटप व नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता,यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या महिलांनी संगीत खुर्ची खेळत ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा संकलित करण्याबाबतचा निर्धार केला.ज्या भगिनी खुर्ची पटकावीत होत्या त्यांना ओल्या कचऱ्यासाठी हिरवी बकेट तर बाद होणाऱ्या भगिनींना सुक्या कचऱ्यासाठी निळी बकेट देण्यात येत होती.या सर्व कार्यक्रमाचे संयोजन कोथरूड मंडल भाजप चिटणीस रमेश चव्हाण,गणेश चव्हाण आणि कविताताई सदाशिवे यांनी केले.यावेळी भाजप चे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर,महिला आघाडीच्या सुवर्णाताई काकडे,सुलभाताई जगताप,तसेच वस्तीतील बचत गटाच्या भगिनी लता चव्हाण,मनीषा घाडगे,यमुना पवार,उपस्थित होत्या.
आम्ही आजचा संदेश स्मरणात ठेवू व कोणत्याही परिस्थितीत ओला व सुका कचरा वेगळा करूनच स्वच्छता कर्मचाऱ्यांना देऊ तसेच ड्रेनेज लाईन मध्ये अन्नपदार्थांचे खरकटे टाकणार नाही असा निर्धार महिलांनी केला आहे असे रमेश चव्हाण व गणेश चव्हाण यांनी सांगित