पुणे -केंद्रीय रस्ते, जलवाहतुक, मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज खडकवासला धरणाला भेट देऊन पाणीसाठ्याची माहिती घेतली दरम्यान पावसाने आता उघडीप दिल्याने नदीमध्ये पाणी सोडणे आज दुपारपासून थांबविण्यात आले आहे . खडकवासला प्रकल्पात आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत एकूण ९७.८१ टक्के एवढा पाणी साठा होता . यावेळी नदीच्या माध्यमातून जलमार्ग सुरु केल्यास इथल्या वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यास मदत होईल. यासाठी केंद्र सरकारच्या जलवाहतुक विभागाच्या वतीने जी मदत लागेल ती करण्याचे आश्वासन गडकरी यांनी दिले आहे.नदीतून जलमार्गाची कल्पना सर्वात प्रथम पुण्यातील प्रख्यात उद्योजक डीएसके यांनी काही वर्षांपूर्वी मांडली होती . खडकवासला येथे ग्रीन थंम्ब आणि इतर खाजगी कंपनी, सामाजिक संस्था यांच्यवतीने खडकवासला धरणातील बारा किलोमीटरचा गाळ काढण्यात आला. त्यातनंर याठिकाणी धरणाच्या कडेला सुशोभिकरण करण्यात आले. या पथदर्शी प्रकल्पाची पाहणी गडकरी यांनी केली. यावेळी त्याच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. हा एक चांगला प्रकल्प असून यामाध्यमातून पुणेकरांना जादा पाणीसाठा उपलब्ध होईल. देशात सिंचनासाठी ८५ हजार कोटीची केंद्र सरकारने तरतुद केली आहे. राज्यातील अपुर्ण जलसिंचन प्रकल्पासाठी ३५ हजार कोटी रुपये मिळणार असून करोडो हेक्टर जमीन पाण्याखाली येणार असल्याचे गडकरींनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीश बापट तसेच सिंचन भावांचे ए .ए. कपोले खडकवासला प्रकल्पाचे राजकुमार क्षीरसागर आदी अधिकारी वर्ग आणि नागरिक उपस्थित होते.

