पुणे- पानशेत ,वरसगाव , टेमघर अद्याप भरतीच्या मार्गावर असतानाच खडकवासला धरण १०० टक्के भरले आणि या धरणातून २०८० क्युसेस प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरु झाला . मुठा नदीतून हे पाणी उजनीला जाणार आहे . आतातरी पुण्याला रोज एक् वेळेचा पाणीपुरवठा करा अशी मागणी पुण्यातून होवू लागली आहे .
एकीकडे खडकवासला १०० टक्के भरले असताना आज सायंकाळ पर्यंत पानशेत ४८ टक्के आणि वरसगाव ४० टक्के तर टेमघर 30 टक्के भरले होते . खडकवासला धरणाची साठवण क्षमता ३.०३ टीएमसी एवढी आहे, त्यातील उपयुक्त पाण्याचा साठा १.९७ टीएमसी एवढा असतो येथे डेड स्टाॅक जास्त असतो पानशेत ची क्षमता खडकवासलाहून किती तरी मोठी आहे . १०.९७ टीएमसी एवढी आहे आणि उपयुक्त पाण्याचा साठ येथे १०.६५ टीएमसी असतो . येथे
डेड स्टाॅक कमी असतो हीच परिस्थिती वरसगाव ला हि आहे . येथे साठवण क्षमता १३.२५ एवढी आहे तर उपयुक्त १२.५२ एवढी आहे . टेमघर धारण छोटे आहे त्याची क्षमता ३.८१ एवढी आहे तर उपयुक्त ३.७१ टीएमसी एवढा साठा असतो .
खडकवासला भरले ..उजनीला पाणी सुटले …. (व्हिडीओ)
Date:

