पाटोदा –
भीषण दुष्काळ आणि मराठवाड्यात निर्माण झालेल्या दुष्काळी समस्या व परिस्थितीवर मात करण्यासाठी बीड च्या पाटोदा परिसरातील आठ गावांमध्ये गतवर्षी मुंबईच्या माझगाव डॉक कंपनी व पुण्याच्या कर्वे समाज सेवा संस्थेच्या संयुंक्त प्रयत्नातून कंपन्यांच्या सामाजिक बांधीलकी (सी एस आर )च्या उपक्रमांतर्गत सुरु करण्यात आलेल्या पर्यावरण व शेतीआधारित उपजीविका प्रकल्पाला २ मे रोजी वर्षपूर्ती होत असतानाच चक्क एप्रिल महिन्यातच शेतकऱ्यांनी सर्वत्र हिरवळ पसरवली असून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी फुलविलेल्या या नंदनवनाचे प्रशासन व परिसरातील नागरिकांकडून सर्वत्र कौतुक होत आहे.
गतवर्षी मुंबई च्या माझगाव डॉक शिप् बिल्डर्स लिमिटेड (एम डी एल) कंपनी चे चेअरमन निवृत्त रिअर एडमिरल आर के श्रावत व पुण्याच्या कर्वे समाज सेवा संस्थेचे प्रा. महेश ठाकूर यांच्या प्रयत्नातून पाटोदा तालुक्यातील पारनेर परिसरातील आठ गावांमध्ये भीषण दुष्काळात होरपळनाऱ्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळावे व पर्यावरणाचा समतोलही साधला जावा या उदात्त हेतूने मुंबई येथील माझगाव डॉक शिप् बिल्डर्स लिमिटेड मुंबई, (एम डी एल) आणि पुणे येथील कर्वे समाज सेवा संस्था, पुणे (समाजकार्य महाविद्यालय) यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधिलकी (सी एस आर) उपक्रमांतर्गत पाटोदा तालुक्यातील पारनेर परिसरातील गावामध्ये दि.२ मे रोजी विविध विकासकामांचे उद्घाटन एम डी एल चे चेअरमन, निवृत्त रिअर एडमिरल आर के श्रावत यांच्या हस्ते करण्यात आले होते व त्यानंतर पारनेर व परिसरातील गावामध्ये सार्वजनिक तसेच वैयक्तिक शेतकर्याच्या शेतीमध्ये उपजीविका आधारित वृक्षारोपण करणे, परिसरातील गावकरी व शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी विहिरींचा आणि तलावांचा गाळ काढणे अशा विविध कामना सुरुवात करण्यात आली होती. गावातील ग्रामस्थ व परिसरातील गावांना शेती आधारित शाश्वत उपाययोजना, शेती आधारित उत्पन्न व रोजगार निर्मितीची संधी निर्माण करणे व शेतकऱ्यांमध्ये आर्थिक स्थिरता आणून शेतकऱ्यांना सक्षम बनविणे या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या या प्रकल्पाचे फलित वर्षपूर्ती होत असतानाच दिसून येत आहे.
कर्वे समाज सेवा संस्थेचे प्रकल्प संचालक प्रा महेश ठाकूर, प्रा.चेतन दिवाण, प्रकल्प समन्वयक चयन पारधी व माझगाव डॉक चे जालिंदर यादव यांनी
नुकतीच वृक्षारोपण केलेल्या सर्व ठिकाणांना तसेच फळझाडे देण्यात आलेल्या वयक्तिक शेतकरी लाभार्थीना भेटी देऊन वर्षभराच्या वृक्ष लागवडीचा आढावा घेण्यात आला.
गतवर्षी पाटोदा तालुक्यातील पारनेर, कुंटेवाडी,शिखरवाडी,नागेशवाडी, गवळवाडी, येवलेवाडी वानेवाडी व धनगर जवळका या आठ गावांमधील १०४२ ( एक हजार बेचाळीस) शेतकऱ्यांना उपजीविकेचे साधन म्हणून आंबा, चिकू, सीताफळ,शेवगा व चिंच अशा ३३२०७ (तेहेत्तीस हजार दोनशे सात ) फळझाडांचे वितरण करण्यात आले होते.तसेच या गावातील रस्ते व सार्वजनिक ठिकाणीही वृक्षलागवड करण्यात आली होती. कर्वे समाज सेवा संस्थेचे राजू घाडगे, अमोल दडस, संजय यादव यांनी सर्व वृक्षांच्या वाढ व संवर्धनासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत जवळ जवळ ८५ % (पंच्याऐंशी टक्के ) झाडे जगवून दाखविली आहेत. एकीकडे शासनामार्फत वृक्षारोपण करण्यात आलेल्या व आढाव्या अभावी जळून गेलेल्या झाडांची दुरावस्था व दुसरीकडे माझगाव डॉक व कर्वे समाज सेवा संस्थेच्या “टीम” च्या उत्कृष्ठ नियोजन व योग्य अंमलबजावणी च्या जोरावर शेतकऱ्यांनी ऐन उन्हाळ्यात बीड मध्ये सर्वत्र हिरवळ फुलवून आणली आहे हे प्रशंसनीय आहे. पाटोद्याचे नायब तहसीलदार गणेश जाधव, कर्वे समाज सेवा संस्थेचे संचालक प्रा. डॉ. दीपक वालोकर , प्रा. महेश ठाकूर , प्रा. चेतन दिवाण, चयन पारधी, जालिंदर यादव, महाडेश्वर, कदम, पारनेर गाव च्या सरपंच सौ औटे आदींनी सर्व शेतकऱ्यांचे कौतुक केले असून गतवर्षी झालेल्या उत्कृष्ठ कामामुळे जालिंदर यादव यांनी आणखी ८ ते १० शेतकऱ्यांना शेततळे देणे, विहिरी व तलावातील गाळ काढणे, शेतकऱ्यांना स्प्रिंकलिंग वाटप करणे अशा अनेक जलसंधारनाच्या कामाना मदत करण्याचे ठरविले असून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली आहे.
गतवर्षी सुरु झालेल्या या वैशिष्ठ्य पूर्ण कामाचा आढावा घेतला असता यावर्षी बहुतांशी ठिकाणी शिवारांमध्ये हिरवळ व मार्च मध्येच संपणाऱ्या विहिरी व तलावाना अद्यापही असणारे पाणी आढळून आले आहे.
आर के श्रावत यांच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाची अमलबजावणी वं यशस्वितेसाठी एम डी एल चे संचालक श्री दास, प्रदीप महादेश्वर, जालीन्दर यादव, श्री कदम आणि कर्वे समाज सेवा संस्थेचे संचालक प्रा. (डॉ.) दिपक वालोकर प्रा महेश ठाकूर, प्रा. चेतन दिवान, चयन पारधी, राजू घाडगे, अमोल दडस, संजय यादव, संबंधित गावकरी व शेतकरी हे प्रयत्नशील आहेत. .


