‘मेक इन इंडिया’ नुसार छोटी शस्त्रे आणि दारुगोळा यांची निर्मिती करणार-कल्याणी ग्रुप आणि आर्सेनल जेएस कंपनीची धोरणात्मक भागीदारी

Date:

कल्याणी ग्रुपची संरक्षण उत्पादने बनवणारी कंपनी कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टिम्स लिमिटेड (केएसएसएल) आणि बल्गेरियाच्या आर्सेनल जॉईंट स्टॉक कंपनी यांच्यादरम्यान एका समझोता करारावर स्वाक्षऱ्या केल्या गेल्या आहेत.  भारतात छोटी शस्त्रे आणि दारुगोळा बनवण्यासाठी ही धोरणात्मक भागीदारी करण्यात आली आहे.

 एआर” ७.६२ x ३९ एमएम असॉल्ट रायफल आणि “एमजी” ७.६२ x ५१ एमएम मशीन गन सीरिज च्या उत्पादनाची क्षमता भारतात विकसित केली जावी या महत्त्वाकांक्षी उद्देशाने केएसएसएल आणि आर्सेनल या दोन्ही कंपन्या एकत्र येऊन काम करणार आहेत.  सैन्यदलाला आवश्यक असलेला विशिष्ट प्रकारचा दारुगोळा बनवण्यासाठी दहा वर्षांच्या एका कार्यक्रमात देखील या धोरणात्मक भागीदारीच्या माध्यमातून सक्रिय सहभाग घेतला जाईल.  आर्सेनलची छोटी  शस्त्रे भारतात गेली अनेक दशके वापरली जात असून त्यांची कामगिरी उत्तम असल्याचे सिद्ध झाले आहे.

आर्सेनल ७.६२ x ३९ एमएम असॉल्ट रायफल एआर-एम५एफ४१
आर्सेनल ७.६२ x ५१ एमएम मशीन गन सीरिज एमजी-एम२

केएसएसएलचे चेअरमन श्री. रजिंदर सिंग भाटिया यांनी सांगितले, छोटया शस्त्रांच्या निर्मिती उद्योगक्षेत्रात पदार्पण करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.  या धोरणात्मक भागीदारीमुळे एक जागतिक दर्जाचे डिझाईन असलेले ओईएम म्हणून आर्सेनलची आजवर उत्तम कामगिरीसाठी सिद्ध झालेली तंत्रज्ञान, माहिती आणि अनुभव कौशल्ये आणि कल्याणी ग्रुपच्या विकास व उत्पादन क्षमता यांचा मिलाप होत आहे.  या धोरणात्मक भागीदारीमुळे सैन्यदलाला देशात बनवलेली, उच्च दर्जाची आणि कमी खर्चाची शस्त्रे वापरता येतील.  केंद्र सरकारच्या मेक इन इंडियाअभियानाला पूरक ठरेल अशी ही भागीदारी आम्ही करत आहोत.”

 

 

आर्सेनल २००० जेएस कंपनीचे कार्यकारी संचालक ह्रीस्तो इबोयूचेव यांनी सांगितले, भारतातील संरक्षण मंत्रालयाची असॉल्ट रायफल, मशीन गन आणि दारुगोळा निर्मितीमध्ये कल्याणी ग्रुपची भागीदार म्हणून मेक इन इंडिया अभियानात सक्रिय सहभाग घेणारी बल्गेरियातील पहिली डिफेन्स ओईएम बनण्याचा मान आर्सेनलला मिळत आहे ही अतिशय मानाची बाब आहे.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्रशांत जगताप स्वार्थी: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुभाष जगताप म्हणाले…

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार , प्रश्नात जगताप यांनी राजीनामा...

प्रशांत जगताप यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम ?

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष...

ड्रंक &ड्राईव्ह , 3 दिवसात पोलिसांनी पकडले 201 चालक

पुणे दिनांक: 22 डिसेंबर 2025 पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान...