पुणे, ता. १२ – ‘शांतिनिकेतन’च्या विश्व भारती विद्यापीठ विद्यार्थिनी काबरा बॅनर्जी यांच्या कुंचल्यातून साकारलेले ‘भद्रलोक’ चित्रप्रदर्शन भोसलेनगरमधील इंडियाआर्ट गॅलरीमध्ये १३ ते २० मे या कालावधीत भरविण्यात आले आहे. सकाळी ११ ते रात्री ८ प्रदर्शनाची वेळ आहे.
दैनंदीन जीवनातील निवांतपणाचे क्षण प्रदर्शनात टिपण्यात आले आहेत. ताजमहलची स्पप्ने पाहात खुर्चीवर पहुडलेली व्यक्ती, बेचवर बसलेली विचारमग्न व्यक्ती, केस विंचणारी महिला, पुस्तक वाचणारी महिला असे चित्रांचे विषय आहेत. जीवनातील प्रत्येक क्षण मौल्यवार आहे. तो वाया घालवू नका. आनंदाने जीवन व्यथित करा असा संदेश या चित्रांतून देण्यात आला आहे.



