जुन्नर /आनंद कांबळे
चिंचोली (ता- जुन्नर) येथील रहिवाशी व मावळ तालुक्यातील उर्से येथील महिंद्रा सी.आय.ई. कंपनीतील संदिप दत्तात्रय पानसरे यांना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर झाला आहे. कामगार व लोकांमधून अभिनंदन करण्यात येत आहे.
संदिप पानसरे २१ वर्षापासून महिंद्रा कंपनीत कार्यरत आहे. काम करीत असताना कामगारांच्या विविध समस्या सोडविणे. कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळवून देणे. अनाथ, गरीब मुलांना शालेय साहित्याचे वाटप करणे. दिव्यांग, मतिमंद, अपंग, मुलांना, साहित्य, धान्य वाटप करणे. निराधार वृद्धांना मदत मिळवून देणे. तळेगाव परिसरात वृक्षारोपण करणे.
शालेय मुलींना वैयक्तिक स्वच्छता व आरोग्य या बाबत महिला वैद्यकीय अधिकाऱ्याच्या मदतीने मार्गदर्शन शिबीर आयोजित करून मोफत सॅनेटरी नॅपकीनचे वाटप करणे. शाळां- शाळांमधून जाऊन “मुठभर धान्य निराधार आजी- आजोबासाठी हा उपक्रम यशस्वीपणे राबविला.
या सर्व समाजोपयोगी कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना गुणवंत कामगार पुरस्कारासाठी निवड केली आहे.