आदिवासी विकास महामंडळात लाभार्थ्यांच्या योजनांवर डल्ला; सव्वा कोटींच्या अपहाराबद्दल 8 तत्कालिन प्रादेशिक व्यवस्थापकांसह एका विजतंत्र्यावर जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल….

Date:

जुन्नर /आनंद कांबळे 
लाभार्थींना डिझेल इंजिन आणि गॅस शेगडीच्या  वितरण योजनेत केलेल्या 1 कोटी 21 लाखांच्या अपहार प्रकरणी आदीवासी विकास महामंडळातील 8 तत्कालिन व्यवस्थापकांसह,एका विजतंत्र्यावर जुन्नर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
जुन्नर पोलीस ठाण्याचे निरीक्षक यशवंत नलावडे यांनी ही माहीती दिली आदीवासी विकास महामंडळात 2004 ते 2009 या कालावधीत हा अपहार झाला होता.या प्रकरणी विजय गांगुर्डे,प्रादेशिक व्यवस्थापक वर्ग 1 रा. नाशिकरोड,जिल्हा नाशिक यांनी फिर्याद दिली आहे.त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार या अपहारप्रकरणी उच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली होती.त्यावरुन न्यायालयाच्या निर्देशानुसार  चौकशी समिती नेमण्यात आली होती.त्यातून हा अपहाराचा प्रकार उघड झाल्याने ही फिर्याद देण्यात आली असून त्यावरुन जुन्नर येथे विविध कालखंडात कार्यरत असलेले तत्कालिन प्रादेशिक व्यवस्थापकांवर अपहारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामध्ये व्ही.टी.जामनिक,बी.जी.घाटकर,एम.पी.धुर्वे,
एस.एन.मांदळे,एम.एस.बुळे,जी.आर.सोनवणे,यु.के.मेंगडे,,एस.एन.मून,या आठ माजी प्रादेशिक व्यवस्थापकांसह, तत्कालिन वीजतंत्री एस.एस.भारमल रा.जुन्नर या आठ आरोपींचा समावेश आहे.पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार संबंधित योजनेत आदीवासी लाभार्थींना द्यावयाची डिझेल इंजिन आणि गॅस शेगडी वितरणाची कोणतीही कागदपत्रे पुरावे न मिळाल्याने या अपहाराचा प्रकार उघडकीस आला होता.या प्रकरणी अधिक माहीतीनुसार जुन्नरच्या आदीवासी विकास महामंडळातील इंजिन,गॅस शेगडी  लाभार्थींसाठी वाहतूक करुन देणारी नंदुरबार येथील आकाशदीप विद्युत कामगार सहकारी संस्था आणि तत्कालिन प्रादेशिक व्यवस्थापक यांनी 215 डिझेल इंजिनांची परस्पर विल्हेवाट लावून 38 लाख 55 हजार452 रुपये आणि तेलपंप फिटींग करुन कार्यान्वित करण्यासाठी दिलेली रक्कम 5 लाख 47 हजार 441 रुपये अशी एकूण 44 लाख 2 हजार 893 रुपयांचा अपहार केला होता.तर 2009 ते 2010 या कालावधीत अनुसुचित जमातीतील दारिद्ररेषेखालिल पात्र लाभार्थींना 100 टक्के अनुदानावर देण्यात येणाऱ्या 511 गॅस शेगडी युनिटची बेकायदेशीर विल्हेवाट लावून अपहार करण्यात आला होता.यात 77 लाख 72 हजार रुपयांचा अपहार करण्यात आला असून शासकीय रकमेचे नुकसान केल्याने संबंधित आठ प्रादेशिक व्यवस्थापकांसह वीजतंत्री असलेले भारमळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयीन आदेशानुसार गठीत केलेल्या समितीने पोलीसांना दिले होते.त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान या गुन्ह्याच्या अपहरीत रकमेची व्याप्ती मोठी असल्याने या गुन्ह्याचा तपास यानंतर आर्थिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांच्याकडे वर्ग करण्यात य़ेणार असल्याची माहीती श्री.नलावडे यांनी दिली.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बोपोडीत ३०० खाटांचे शासकीय रुग्णालय व्हावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी

'ससून' ची विश्वासार्हता जपणे गरजेचे -पश्चिम महाराष्ट्रातील अनेक रुग्णांची...

रेशन माफियांवर कडक कारवाई करूनशासनाने जरब बसवावी-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : गरीब, सामान्य नागरीकांसाठी असलेले रेशन वरील धान्य...

पुण्यातील रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरिता हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरिता पुणे-मुंबई, पुणे-बेंगळुरू, पुणे-हैदराबाद या...

तर तेव्हा फडणवीस जनसंघी अनुयायांसह ‘मुग गिळुन’ गप्प का होते..?

मुंबई -दि २६ फेब्रू २०२६-काँग्रेस काळात मोगलांचा इतिहास १७...