सेनेतून हकालपट्टीचे वृत्त समजताच आशा बुचके यांना  मानसिक धक्का-उपचारासाठी रुग्णालयात – ‘अन्याय झाला ‘समर्थकांचा दावा

Date:

जुन्नर /आनंद  कांबळे
शिरूर  लोकसभा मतदारसंघात   शिवसेनेच्या उमेदवाराचा झालेला पराभव पक्षसंघटनेेच्या जिव्हारी लागल्याने  सुरू झालेल्या झाडाझडतीत शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्ष विरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेऊन   शिवसेना जि प गटनेत्या आशाताई बुचके यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात  आली . हकालपट्टी करण्यात आल्याचे वृत्त समजताच आशाताई बुचके यांना  मानसिक धक्का बसल्याने  त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागले.आशाताई बुचके यांचा रक्तदाब तसेच रक्तातील साखर वाढल्याने तातडीचे उपचार करावे लागले. त्यांची प्रकुती स्थिर असुन जुन्नरमधील आधार हॉस्पिटलमध्ये त्यांना भेटण्यासाठी   सर्वपक्षीय पदाधिकारी ,नेते कार्यकर्ते यांची गर्दी  झाली होती.तर त्यांना रुग्णालयात  दाखल केल्यापासुन त्यांच्या  समर्थकांनी आशाताई यांच्यावर अन्याय झाला अशी प्रतीक्रीया देत दिवसभर रुग्णालयाच्या बाहेर गर्दी केली होती.
           विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  आमदार शरद सोनवणे शिवसेना  पक्षात प्रवेश करणार   हे  स्पष्ट झाल्यानंतर आशाताई बुचके  यांनी नारायणगाव येथे झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आमदार शरद सोनवणे यांच्या पक्ष प्रवेशास विरोध केला होता.तर बुचके यांचा विरोध झुगारून सोनवणे यांना पक्षात प्रवेश देण्यात आला होता. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत  शिवसेनेचा झालेला पराभव,कोणाचे नाव न घेता पक्षाच्या भूमिकेला बुचके यांनी केलेला विरोध, विधानसभा निवडणुकीत बुचके यांची संभाव्य भुमिका या सर्व पार्श्वभूमीवर बुचके यांच्या हकालपट्टीचा निर्णय झाल्याचे समजते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अतुल बेनके, विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर,पंचायत समिती सभापती ललिता चव्हाण, पंचायत समिती गटनेते दिलीप  गांजाळे , जुन्नर शहर प्रमुख शिवदर्शन खत्री, गणेश कवडे,माजी नगरसेवक  अविनाश करडीले,  जि प सदस्य गुलाब पारखे,माजी पंचायत समिती सदस्य महेंद्र सदाकाळ,संदीप ताजणे,  माजी पंचायत समिती सभापती दशरथ पवार,राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरज वाजगे,शैलेश गायकवाड तसेच  शिवसैनिक कार्यकर्ते यांनी रुग्णालयात  आशाताई बुचके यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली.
   यावेळी रुग्णालयात  आशाताई बुचके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना  भावना अनावर होत होत्या.  शिवसेना पक्षाने घेतलेला  निर्णय मला जिव्हारी लागला आहे,मी शिवसेना प्रमुख   बाळासाहेब ठाकरे यांची   शिवसैनिक आहे.आता जर बाळासाहेब असते तर माझ्यावर असा अन्याय कदापी  झाला नसता. लोकसभा निवडणुकीत मी  प्रामाणिकपणे काम केले  शिरूर लोकसभा  मतदारसंघात खासदार शिवाजीराव आढळराव यांना  सर्व ठिकाणी नाकारले असुन त्या संदर्भात मला एकटीला दोष देण्याची आवश्यकता नाही, शिवसैनिक सांगतील तो निर्णय घेण्यात येईल,माझा शिवसैनिकांवर  विश्वास आहे अशी प्रतिक्रिया बुचके  यांनी व्यक्त केली
 -माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा लोकसभा  निवडणुकीत पराभव झाला होता. तो पक्षाच्या जिव्हारी लागला होता  निवडणूक रननीती तज्ञ प्रशांत किशोर  यांनी लोकसभा निवडणुकीत च्या काळात कोणी कोणी पक्षविरोधी काम केले याची यादी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दिली होती.याचे वृत्त लोकसभा मतदानानंतर  प्रसिद्ध झाले होते.आढळराव यांची पक्षाच्या उपनेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर पक्षात झाडाझडतीची  कारवाई सुरू झाली आहे. होती.
-आशाताई  बुचके या 2002 पासून जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. तर शिवसेनेच्या जिल्हा परिषद  गटनेत्या म्हणुन त्या कार्यरत होत्या. त्यांनी 2009 आणि 2014 मध्ये पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढविली होती.  २००९ मध्ये शरद सोनवणे यांना दिलेले  विधानसभेचे  तिकीट पुन्हा आशाताई यांना देण्यात आले होते.या निवडणुकीत आशाताई बुचके यांना  वल्लभ बेनके यांच्या विरोधात ६००० मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. तर २०१९  च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते पडली होती.तर जिल्हा परिषद निवडणुका त्यांनी तालुक्यात विविध गटातून लढविल्या होत्या.
-लोकसभा निवडणुकीत जुन्नरमध्ये शिवसेना पक्षाला सर्वात  मोठा फटका बसला होता.  येथे राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांना 42  हजाराचे मताधिक्य मिळाले होते.  (५)बुचके यांच्या हकालपट्टीने शरद सोनवणे यांनी जुन्नरची  विधानसभेची उमेदवारी निश्चित झाल्याचे समजण्यात येत आहे.
फोटोमध्ये —आशाताई बुचके यांच्या तब्येतीची विचारपूस करताना  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते अतुल बेनके,कॉंग्रेसचे सत्यशील शेरकर
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पारंपरिक प्रचाराला आधुनिकतेची जोड! बीडकरांची प्रचारात आघाडी; प्रभाग २४ मध्ये फिरू लागले ‘विकासरथ’

पुणे-महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता इच्छुकांच्या नजरा प्रमुख पक्षकांकडून...

माणिकराव कोकाटेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी:मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीला राज्यपालांची मंजुरी

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते...

घरातच केली हायड्रोपोनिक गांजा ची लागवड -साडेतीन कोटीचा गांजा जप्त

पुणे : ३१ डिसेंबर च्या पार्ट्यांचे आयोजने सुरु असताना...