जुन्नर/आनंद कांबळे
जुन्नर तालुक्यातील नाणेघाट व किल्ले जीवधन परीसरात निसर्गरम्य जुन्नर तालुका पेज परिवारातर्फे नगर,कल्याण, सातारा, लातुर,पुणे व नाशिक जिल्ह्यातील ६० पर्यटकांच्या माध्यमातून १२ प्रजातींच्या विविध वृक्षांच्या जवळपास ५ किलो बियांचे रोपण अंदाजे ३ हेक्टर क्षेत्रात करण्यात आले. या परीसरातील प्लास्टिक गोळा करून हा परीसर प्लास्टीकमुक्त करण्यात आला. विशेष म्हणजे गेली ४ वर्ष लगातार पावसाळा सुरू होण्याआधी हा उपक्रम रमेश खरमाळे (माजी सैनिक) निसर्गरम्य जुन्नर तालुका फेसबुक पेज व सह्याद्रीचे सौंदर्य ग्रुपच्या माध्यमातून राबवत असुन विनायक साळुंके, प्रविण खरमाळे, स्वाती खरमाळे व सैराट टीमचे विशाल बो-हाडे साथ देत आहेत.
आज बियांचे रोपण केल्यानंतर लगेचच २ तासांत नाणेघाट परीसरात पावसाने जोरदार हजेरी लावली व रोपण केलेल्या बियांची उगवण काही दिवसांतच होईल असा आनंद आलेल्या सर्व पर्यटकांनी व्यक्त केला.
खरमाळे प्रत्त्येक वर्षी पावसाळ्या आगोदर जुन्नर तालुक्यातील विविध ठिकाणी निःशुल्क ट्रेकचे आयोजन बिया रोपण, स्वच्छता अभियान व ट्रेक असे आयोजन करत असून आलेल्या पर्यटकांना किल्ले, पर्यावरणाचे मानविय जीवनात महत्त्व , ट्रेक का? व कशासाठी? व जुन्नर तालुक्यातील ऐतिहासिक वारसा याबाबत मार्गदर्शन करत आहे.
आज बिया रोपणानंतर किल्ले जीवधन कल्याण दरवाज,जीवाईदेवी, धान्यकोठार, जुन्नर दरवाजा मार्गे वानर लिंंगी असा ट्रेक करत उपक्रमाची सांगता आलेल्या पर्यटकांचे आभार मानुन झाली