जुन्नर -२७(संजोक काळदंते)
अष्टविनायका पैकी असणाऱ्या तीर्थ क्षेत्र ओझर(ता.जुन्नर) या ठिकाणी संकष्टी चतुर्थी निमित्त सुमारे पन्नास हजार भाविकांनी श्री विघ्नहराचे दर्शन घेतले.
सकाळी ५ वाजता मंदिर उघडण्यात येऊन श्री विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शाकुजी कवडे विश्वस्त देवीदास कवडे,बबन मांडे,बाळासो कवडे, पी बी जगदाळे यांच्या हस्ते श्री स अभिषेक करण्यात आला.दिवसभरात सकाळी ७ दु १२ व रात्री १०:३० ला श्रींची महाआरती करण्यात आली.सकाळी ८ वाजता प्रवीण कवडे यांनी मंदिरात ज्ञानेश्वरीग्रंथाचे वाचन केले. देवस्थान मार्फत भाविकांना सकाळच्या सत्रात खिचडी वाटप करण्यात आले व सायकाळ च्या सत्रात महाप्रसाद देण्यात आला सुमारे दोन हजार भाविकांनी याचा लाभ घेतला.वारकरी साम्प्रदायस शांताराम जयराम कवडे यांनी अन्नदान केले.ट्रस्ट मार्फत भाविकांसाठी पिण्याचे पाणी,पाय घड्या,अभिषेक कक्ष यांची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती
आजच्या महाप्रसाद देणगीदार मध्ये पीयूषभाई बाबूभाई सयानी, रशिदाबेग पीयूषभाई सयानी,प्रिन्सि पीयूष सयानी,आस्था पीयूष सयानी सूरत गुजरात व विकास मल्होत्रा,एस रघु औंध पुणे यांनी प्रत्येकी एकविस हजार रु दिले.
दर्शनासाठी येणाऱ्या मान्यवरमधे शिक्षण संचालक पुणे चे रामचंद्र जाधव,ठाणे येथील शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख सुभाष घरत ,बँक ऑफ महाराष्ट्रचे झोनल मॅनेजर एम डी नाडकर्णी,लक्ष्मी जावळेकर यांचा समावेश होता.साय ८ ते चंद्रोदय पर्यंत ह भ प नंदू महाराज गावडे,येडगाव यांचा कीर्तनाचा कार्यक्रम झाला त्यानंतर रात्री १०:३० वा आरती होऊन मंदिर बंद करण्यात आले.दर्शनाचे नियोजन ट्रस्ट चे व्यवस्थापक व कर्मचारी वर्गाने केले