पुणे- पुण्यात कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता, सर्वत्र लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक आहे. तसेच कालच सरकारने ४५ वर्षावरील सर्व नागरिकांना कोरोना लस देण्यात येणार आहे अशी घोषणा करण्यात केली त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक आहे. पुणे शहराला लवकरात लवकर करोना मुक्त पुणे शहर
करण्याच्यादृष्टीने पुणे शहरात पुण्यातील नागरिकांसाठी जम्बो कोव्हीड सेंटर च्या धरती
वर जम्बो कोव्हीड लस सेंटर उपलब्ध करण्याची गरज असून लवकरात लवकर जम्बो कोव्हीड लस सेंटर उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी भाजपचे नगरसेवक आदित्य माळवे यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांना पत्र देऊन केली आहे.
पुण्यातील नागरिकांना जम्बो कोव्हीड सेंटर च्या धरती वर जम्बो कोव्हीड लस सेंटर उपलब्ध करून द्यावे-नगरसेवक आदित्य माळवे
Date:

