राधिका जहागीरदार यांना ‘मिसेस महाराष्ट्र’चा बहुमान

Date:

पुणे : अभियंता असलेल्या पुण्यातील राधिका जहागीरदार यांना ‘मिसेस महाराष्ट्र २०१९’चा बहुमान मिळाला आहे. दिवा पेजेंट्सच्या वतीने आयोजित ‘मिसेस महाराष्ट्र’ या सौंदर्यवती स्पर्धेत राधिका यांनी सर्वच आघाड्यांवर उत्कृष्ट कामगिरी करत ‘मिसेस महाराष्ट्र’चा मुकुट पटकावला. पुण्यातील हयात हॉटेलमध्ये नुकतीच ही स्पर्धा पार पडली. राज्यभरातून एकूण ५० सौंदर्यवतींनी यामध्ये भाग घेतला होता. बौद्धिक स्पर्धा, स्वपरिचय, आकर्षक देहबोली, प्रश्नोत्तरे अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर आघाडी घेत राधिकाने अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. अंतिम फेरीतील १२ जणींमध्ये उल्लेखनीय परफॉर्मन्स देत राधिकाने प्रथम क्रमांक मिळवला.

स्पर्धेचे परीक्षक म्हणून बॉलिवूड अभिनेत्री झोया अफरोज, मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकर व प्रसिद्ध हिंदी अभिनेता गुलशन ग्रोवर यांनी काम पहिले. यावेळी ‘दिवा पेजेन्ट्स’च्या संचालिका अंजना मस्कारेन्हास, कार्ल मस्कारेन्हास, राधिकाचे कुटुंबीय उपस्थित होते. या बहुमानाबद्दल राधिकाने आनंद व्यक्त केला. राधिका म्हणाल्या, “मी मूळची अमरावतीची असून, सध्या पुण्यातील कमिन्स टेक्नॉलॉजी सेंटरमध्ये अभियंता म्हणून कार्यरत आहे. माझे पती निशिज हेही सॉफ्टवेअर अभियंता आहेत. मला आठ वर्षांची ईवा नावाची मुलगी आहे. माझ्या या प्रवासात पती निशीज, सासू सासरे आणि आई वडीलांच्या पाठिंबा मिळाला. त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे आणि अंजना व कार्ल सरांच्या मार्गदर्शनामुळे हे यश मिळवू शकले.”

राधिका गेल्या १७ वर्षांपासून पुण्यात राहत आहेत. त्यांनी ‘व्हीआयटी’मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे, तर बिट्स पिलानी मधून मास्टर्सचे शिक्षण घेतले असून, ऑटोमोबाईल क्षेत्रात कार्यरत आहेत. बाईक रायडींग, प्रवास, नृत्य यामध्येही त्यांना विशेष रुची आहे. अनाथ मुलांसाठी गेल्या १० वर्षांपासून त्या काम करीत आहेत. सौंदर्य स्पर्धेनंतर राधिकाने सर्व तरुण मुलींना, आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करा, असा संदेश दिला. राधिका सामाजिक कार्यात सतत संवेदनशीलरीत्या कार्यरत असतात. समाजाचा एक घटक म्हणून जगताना कुणाकडून काही घेण्यापेक्षा इतरांना देण्यात मला जास्तं आनंद मिळतो, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

यश चोपड़ा फाउंडेशन तर्फे ‘साथी 2026’ची घोषणा; कल्याणकारी उपक्रमांचा विस्तार

यश चोपड़ा फाउंडेशन (YCF), ही यश राज फिल्म्स ची सामाजिक...

अजित पवारांच्या विमानाचे 3000 तासांचे रेकॉर्डच नाही: ‘VSR’ कंपनीच्या रेकॉर्डमध्ये हेराफेरी असल्याचा रोहित पवारांचा आरोप

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर आता या...

मानवतेसाठीचे अलौकिक बलिदान – गुरू तेग बहादुरजी

अमृतसरच्या गुरू महालात शिख धर्मीयांचे सहावे गुरू हरगोबिंदजी आणि...