तंत्रशिक्षण संचालनालय, केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटतर्फे औद्योगिक-शैक्षणिक संस्था समन्वय परिषदेचे आयोजन

Date:

पुणे : तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि येवलेवाडी येथील केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय औद्योगिक-शैक्षणिक संस्था समन्वय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवारी (दि. ११) व सोमवारी (दि. १२) या दोन दिवशी ही समन्वय परिषद बापदेव घाटाच्या पायथ्याशी असलेल्या केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या कॅम्पसमध्ये होणार असून, त्याचे उद्घाटन रविवारी सकाळी १०.३० वाजता राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे व तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक सी. टी. कुंजीर व केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष कल्याण जाधव यांनी पत्रकार परिषदेत शुक्रवारी दिली. यावेळी केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. हेमंत अभ्यंकर, प्राचार्य डॉ. सुहास खोत, प्रा. प्रकाश वाणी, डॉ. सी. एम. सेवतकर आदी उपस्थित होते.
सी. टी. कुंजीर म्हणाले, “देशाच्या विकासासाठी औद्योगिक-शैक्षणिक संस्था समन्वय अतिशय महत्वाचा असून, तंत्रशिक्षणामध्ये आपण प्रगती करीत आहोत. दर्जेदार आणि प्रात्यक्षिक शिक्षण देण्यासाठी या गोष्टी होणे महत्वाचे असून, त्याच दृष्टिकोनातून ही दोन दिवसीय परिषद आयोजिली आहे. नवकल्पना, उद्योजकता विकास, कौशल्याधारित शिक्षण आदी बाबींवर या परिषदेत चर्चा होणार आहे. बीजभाषण, चर्चासत्र आणि प्रकल्पांचे प्रदर्शन असणार आहे. डॉ. संजय इनामदार यांचे इनोव्हेशन इन इंडस्ट्री विषयावर बीजभाषण होणार आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चरचे अध्यक्ष डॉ. प्रदीप भार्गव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, हुबळी येथील डॉ. नितीन कुलकर्णी उद्योजकता विकास यावर मार्गदर्शन करणार आहेत.”
कल्याण जाधव म्हणाले, “परिषदेच्या दुसऱ्या दिवशी डॉ. संदीप इनामदार ‘इंडस्ट्री बेस्ड प्रोजेक्ट्स’ यावर, तर आनंद जोशी ‘रिव्हर्स इंजिनिअरिंग’ यावर मार्गदर्शन करणार आहेत. परिषदेचा समारोप महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण महामंडळाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. या परिषदेत चार चर्चासत्रे होणार असून, त्यामध्ये औद्योगिक व शैक्षणिक संस्थांमधील तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. याशिवाय, विद्यार्थ्यांनी तयार केलेले काही नाविन्यपूर्ण प्रकल्प प्रदर्शित केले जाणार आहेत.”
डॉ. हेमंत अभ्यंकर म्हणाले, “अभियांत्रिकी महाविद्यालये आणि उद्योगांनी एकत्रित येऊन काम केले, तर दोघांनाही फायद्याचे आहे. त्यातून शिक्षणसंस्था चांगल्या पद्धतीने कौशल्य प्रशिक्षण देऊन उच्च प्रतीचे मनुष्यबळ उद्योगांना पुरवतील. शिक्षण संस्थांमध्ये होणाऱ्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांना उद्योगांचे पाठबळ मिळाले, तर त्यातून उत्पादननिर्मिती शक्य होईल. त्यामुळे अशा परिषद उपयुक्त ठरतील.”
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ईडीने अनिल अंबानींचे 3716 कोटी रुपयांचे 17 मजली घर केले जप्त : 40 हजार कोटींच्या फसवणूक प्रकरणात चौकशी सुरू

मुंबई-अंमलबजावणी संचालनालयाने (ED) रिलायन्स ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी यांचा...

अबब गुटखा विक्री प्रकरणी ५ वर्षांत १८ हजार आरोपी गजाआड ! २३९ कोटी १० लाखांचा मुद्देमाल जप्त- मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

आमदार जगताप यांच्या विधानसभेतील तारांकित प्रश्नानंतर धक्कादायक माहिती उघडमुंबई...

बांधकाम साईट्सवर प्रदूषण सेन्सर बंधनकारक:’क्लिन एअर पोर्टल’ डॅशबोर्डचे लोकार्पण, पातळीवर लक्ष ठेवणार-महापौर मंजुषा नागपुरे

पुणे -शहरात बांधकामांच्या ठिकाणी होणारे वायूप्रदूषण रोखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल...

स्त्री जन्माचा दर कमी होतोय .. याची गंभीर दखल घेणार कधी ?आमदार जितेंद्र आव्हाड

स्त्री भ्रूण हत्या, गर्भलिंग चाचणी करणरे डॉक्टर,...