गोरगरिबांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य द्यावे -रामदास आठवले

Date:

पुणे : “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील सर्व जाती-धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन त्यांचा सर्वांगीण विकास साधण्याची शिकवण दिली. त्यांच्या आदर्शांवर काम करणारा आपला पक्ष आहे. झोपडपट्टीत राहणाऱ्या गोरगरीब, कष्टकरी वर्गाचे जीवनमान उंचावण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, ही जाणीव ठेवून सुनीता वाडेकर यांच्या पुढाकारातून ही तीन कोटींची विकासकामे झाली आहेत, याचा आनंद वाटतो. वंचितांच्या जीवनात आनंद भरण्यासाठी त्यांच्या समस्या सोडविण्याला आपण नेहमी प्राधान्य द्यावे,” असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (A) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले.
औंध-बोपोडी प्रभागातील तीन कोटींच्या निधीतून केलेल्या विविध विकासकामांचे उद्घाटन रामदास आठवले यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. माता रमाई आंबेडकर विद्यालयात झालेल्या या समारंभावेळी राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर, खासदार गिरीश बापट, आमदार विजय काळे, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपब्लिक पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, शहराध्यक्ष अशोक कांबळे, अल्पसंख्याक आघाडीचे आयुब शेख, कार्याध्यक्ष संजय सोनवणे, नगरसेविका सुनीता वाडेकर, अर्चना मुसळे, नगरसेवक विजय शेवाळे, प्रकाश ढोरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

शाळांमध्ये संविधान उद्येशिका स्तंभ, बुध्दविहार, व्यायामशाळा, मंदिराची डागडुजी, वाचलनाय, पक्के रस्ते, सीसीटीव्ही कॅमेरे, उद्यानाची निर्मिती, स्वच्छतागृह, पाण्याच्या टाक्यांची उभारणी अशा विविध विकासकामांचे उद्घाटन यावेळी झाले. मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल आठवले व महातेकर यांचा विशेष सत्कार प्रभागाच्या वतीने करण्यात आला.

अविनाश महातेकर म्हणाले, “अतिशय कल्पकतेने ही विकासकामे उभारली आहेत. राज्यघटनेचे पहिले पान शाळेत लागले हे महत्त्वाचे आहे. त्यातून लोकांना प्रेरणा मिळेल. माता रमाई आणि डॉ. आंबेडकर यांच्या शिल्पामुळे शाळेचा परिसर अधिकच शोभनीय झाला आहे. या चारही नगरसेवकांनी एकत्र येऊन प्रभागात केलेल्या कामांमुळे लोकांच्या जीवनात बदल घडतील. माझ्यावर टाकलेली मंत्रिपदाची जबाबदारी योग्यरितीने सांभाळून वंचित घटकांना न्याय देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे.”

गिरीश बापट म्हणाले, “सामान्य माणसाला जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी आपण केले पाहिजे. त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण करून त्याला दैनंदिन जीवन सुखाचे जगण्याची संधी आपण द्यायला हवी. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी नेहमी उभा असतो. गोरगरीब माणसांची सेवा हेच आंबेडकर यांना वंदन असून, त्यांच्याकडून प्रेरणा घेत कामी करत आहे. चांगल्या कामांसाठी पैसा कमी पडू देणार नाही. या प्रभागात उभारलेली कामे कौतुकास्पद आहेत.”
रामदास आठवले म्हणाले, “गरिबीत अहोरात्र काबाडकष्ट करून जीवन जगणाऱ्या लोकांसाठी आरोग्य, शिक्षण यासह मूलभूत सुविधा पुरवाव्यात. समाजाच्या हिताचे काम करण्यावर भर दिला पाहिजे. समाजाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी चांगल्या गोष्टी उभारणे गरजेचे आहे. माझ्या मंत्रालयामार्फत अनेक चांगले कामे करणार आहे. लोकांनी चांगले प्रकल्प घेऊन यावे. त्यासाठी लागणार निधी उपलब्ध करून देईन. महिलांनी बचत गट आणखी बळकट करावेत. गिरीश बापट यांचे काम खूप चांगले असून, त्यांना लवकरच केंद्रात मंत्रिपद मिळावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधानाला धरून काम करीत आहेत. देशातील गरिबी निर्मूलन होण्यासाठी आम्ही सगळेच मेहनत घेत आहोत.”
परशुराम वाडेकर यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश ढोरे यांनी आभार मानले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भाजपा कार्यालयासमोर दलीत, रिपब्लिकन कार्यकर्ते करणार निदर्शने

पुणे: भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून उमेदवारी देताना दलीत आणि मागासवर्गीय,...

भाजपाच्या डिजिटल प्रचार रथांचे उद्घाटन

पुणे, दि. २८ : भारतीय जनता पक्षाच्या डिजिटल प्रचार...

बॉलिवूडच्या इतिहासातील चौथी सर्वात मोठी फिल्म ठरली धुरंधर:वर्ल्डवाइड कलेक्शन 1029 कोटी

रणवीर सिंगचा 'धुरंधर' चित्रपट बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये सातत्याने मोठे...

अभिनेत्री हेमलता पाटकर 10 कोटीच्या खंडणी प्रकरणात गजाआड

मुंबई-गोरेगाव येथील एका प्रतिष्ठित बिल्डरला 10 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी...