पंजाबी गायिका गिन्नी माहीने जिंकली रसिकांची मने

Date:

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे बोपोडीत रंगला शाहिरी जलसा 
पुणे : पहाडी आवाजातील भीमगीते, पंजाबी संगीतावरील भांगडा आणि गाण्यांतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केलेले वंदन यामुळे पंजाबी गायिका गिन्नी माहीने रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळवत मने जिंकली. उपस्थितांतून होणारा टाळ्यांचा कडकडाट, शिट्ट्याही पाहायला मिळाला. गिन्नी माहीच्या पंजाबी बुद्ध आणि भीमगीतांनी बोपोडीकरांच्या मनावर मोहिनी घातली.
विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त आयोजित सांस्कृतिक महोत्सवात गीन्नी माही हिच्या बुद्ध, शिवराय, फुले, आंबेडकर यांच्यावर आधारित हिंदी-पंजाबी गीतांचा शाहिरी जलसा रंगला. गिन्नी माहीचा पुण्यात पहिल्यांदाच कार्यक्रम असल्याने तिच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. बोपोडीतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात झालेल्या या कार्यक्रमाला हजारो पुणेकरांनी उपस्थिती लावली. सांस्कृतिक महोत्सव समितीचे प्रमुख परशुराम वाडेकर यांच्या पुढाकारातुन हा कार्यक्रम झाला. यावेळी नगरसेविका सुनीता वाडेकर, प्रकाश ढोरे, निवेदक दीपक म्हस्के यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
‘बाबासाहेब तुझको है प्रणाम मेरा’, ‘भीमा तेरे सोच को सलाम’, ‘नमो बुध्दाय नमो नमो’, ‘बाबा लिख दिया ऐसा संविधान’, ‘आँखो में बुद्ध, बातोमे बुद्ध’, ‘रमाबाई तेरे चरणो में सजदा सोसो बार करूं’, ‘फॅन बाबासाहब दी’ यासह बहारदार भीमगीते सादर करत गिन्नी माहीने अक्षरक्ष: खिळवून ठेवले. आपल्या सादरीकरणात रसिकांना सामावून घेत भांगडा नृत्यावर ठेका धरायला लावला. हिंदी-पंजाबी गीतांच्या नजराण्याने बोपोडीकरांचे कान तृप्त झाले. सूत्रसंचालन गौरवकुमार, दीपक म्हस्के यांनी केले. तबल्यावर सरबजीत, कीबोर्डवर धर्मेंद्रसिंग, ढोलकीवर संदीपकुमार, गिटारवर कांचन लिंबाळकर यांनी साथसंगत केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आज आपण सर्व सन्मानाने जगत आहोत. त्यांच्या कर्मभूमीवर येऊन माझी कला सादर करण्याची संधी मला मिळाल्याने खूप आनंदित झाले आहे. आयुष्यभर गायनाच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार, तत्वज्ञान जगभर पोहोचविण्यासाठी कार्यरत राहणार आहे, अशी भावना गिन्नी माही हिने यावेळी व्यक्त केली.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

क्षेत्रीय कार्यालयांची रचना विशिष्ट राजकीय पक्षाच्या फायद्याची असल्याचा आरोप:आयुक्तांकडे लेखी तक्रार

पुणे -राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुणे महानगरपालिका आयुक्तांकडे क्षेत्रीय कार्यालये...

पुणे शहरातून नऊ गुंड तडीपार:पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांची कारवाई

पुणे- शहरातील बिबवेवाडी, आंबेगाव आणि मार्केट यार्ड परिसरात दहशत...