सलग दुसऱ्या वर्षी शाळेचा निकाल १०० टक्के; तीन विद्यार्थ्यांना ९०च्या पुढे, तर पाच विद्यार्थ्यांना ८०च्या पुढे गुण
पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीच्या परीक्षेत सूर्यदत्ता नॅशनल स्कूलचा निकाल सलग दुसर्या वर्षी 100 टक्के लागला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवत शाळेसाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. तीन विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा अधिक, तर पाच विद्यार्थ्यांना 80 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. सुयश अयाचित 94.4 टक्के गुण मिळवत प्रथम, पियुष बॅनर्जी 93.4 टक्के गुण मिळवत द्वितीय, तर साहिल बदामी 93 टक्के गुण मिळवत तृतीय आला आहे. पियुष बॅनर्जी याने सामाजिक शास्त्र विषयात, तर तनिषा अगरवाल हिने हिंदी विषयात 99 टक्के गुण मिळवले आहेत.
आयसीएसई, आयबी, एसएससी, सेमी इंग्रजी आणि महापालिका शाळा अशा पार्श्वभूमीतून हे विद्यार्थी आले होते. त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षक व इतर स्टाफने खूप मेहनत घेतली होती. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याने त्यांच्या मेहनतीला चांगले फळ मिळाले आहे. व्यक्तिगत आढावा, प्रोत्साहन, मार्गदर्शन यासह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर शाळेने भर दिला. त्याच जोरावर शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील ऑलिम्पियाड्समध्ये विजेतेपद पटकावले आहे.
सूर्यदत्ता नॅशनल स्कूलच्या प्राचार्या श्रीमती शीला ओका आणि त्यांच्या शिक्षक सहकार्यांच्या मेहनतीमुळेच हे यश प्राप्त झाले आहे. सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉ. संजय बी. चोरडिया, सुर्यदत्ता नॅशनल स्कूलच्या सचिव सुषमा चोरडिया, संचालिका डॉ. अर्चना कालरा यांनी प्राचार्य, शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
—————————
सुयश अयाचित (९४.४ टक्के)
पियुष बॅनर्जी (९३.४ टक्के व समाजशास्त्रात ९९ गुण)
साहिल बदामी (९३ टक्के)
तनिषा अगरवाल (हिंदीमध्ये ९९ गुण)





