पुणे : श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात मृत्युमखी पडलेल्या १३ भारतीयांसह ३२१ नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे (A) आज बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, ससून रुग्णालयासमोर पुणे स्टेशन येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मेणबत्य्या लावून मृतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. तसेच हा दहशतवादी भ्याड हल्ला करणाऱ्यांचा निषेध करण्यात आला.
शहराध्यक्ष अशोक कांबळे, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष परशुराम वाडेकर, शहर युवक अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, संयोजक संजय सोनवणे, संपर्कप्रमुख अशोक शिरोळे, कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड, निलेश आल्हाट, मंदार जोशी, महिपाल वाघमारे, बाबुराव घाडगे, मोहन जगताप, भगवान गायकवाड, चिंतामण जगताप, महादेव कांबळे, गौतम शिंदे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.


