जिओ मार्च अखेर पर्यंत फ्री -मात्र अनेकांना कार्ड घेवूनही सुविधा नाहीतच ..
जिओचे कार्ड ज्यांनी घेतले आहे आणि ज्यांचे नेट तसेच कॉलिंग व्यवस्थित सुरु आहे अशा मोबाईलधारकांसाठी आनंदाची बातमी आहे . ती म्हणजे यापुढे फ्री स्वेच कालावधी अंबानीनी वाढविला आहे .डिसेंबर अखेरपर्यंत पूर्वी फ्री स्व असल्याचे जाहीर करण्यात आले होते आता हि सुविधा मार्च २०१७ अखेर पर्यंत फ्री मिळणार आहे . शिवाय यापुढे कोणत्याही मोबाईल कंपनीचे कार्ड जिओमध्ये पोर्ट करता येणार आहे. तसेच जुन्या आणि नवीन ग्राहकांना 31 मार्च 2017 पर्यंत जिओतर्फे मोफत सेवा देण्यात येणार आहे. अशी घोषणा मुकेश अंबानी यांनी आज (गुरुवारी) केली. यापूर्वी जिओची मोफत सेवा ही 31 डिसेंबरपर्यंत होती.
ते म्हणाले की, 83 दिवसात रिलायन्स जिओने पाच कोटी पेक्षा जास्त ग्राहक जोडले असून मागच्या तीन महिन्यात रिलायन्सने जिओने दररोज सहा लाख ग्राहक जोडले आहेत. तसेच फेसबुक, व्हॉटसअॅप, स्काईपपेक्षा रिलायन्स जिओ वेगाने वाढली असून रिलायन्स जिओ जगातील वेगाने पुढे जाणारी कंपनी असल्याचां दावा त्यांनी केला .