जेट एअरवेजच्या मेगा सेलमुळे प्रवासखर्चात ५० टक्क्यांपर्यंत बचत

Date:

~ एअरलाइनच्या वेबसाइटवरून तसेच मोबाइल अॅपवरून बुकिंग केल्यास एक्स्लुसिव्ह लाभ ~

मुंबई २०१९ सालाचे भव्य स्वागत करत, जेट एअरवेज या भारतातील आघाडीच्या, पूर्ण-सेवा आंतरराष्ट्रीय एअरलाइन कंपनीने सात दिवसांच्या आकर्षक ग्लोबल फेअर सेलची घोषणा केली आहे.

आजपासून लागू होणाऱ्या या सेलमध्ये ग्राहक एअरलाइनची तिकिटे बुक करून इकोनॉमी आणि प्रीमियम या दोन्ही विभागांत ५० टक्क्यांपर्यंत* भरघोस सवलत मिळवू शकतात. हा सेल एअरलाइनच्या देशांतर्गत व परदेशातील नेटवर्कमधील निवडक ठिकाणांसाठी लागू असून, यामध्ये भारतातील एअर फ्रान्स व केएलएम रॉयल डच एअरलाइन्स या कंपन्यांच्या विमानसेवेचाही समावेश आहे. यात सार्क, असिआन, आखाती देश (मस्कत व शारजाह वगळता), मँचेस्टरसह युरोप आणि उत्तर अमेरिकेतील टोरोंटो या ठिकाणांचा समावेश होतो.

सेलच्या काळात बुकिंग केलेल्या एकमार्गी तसेच येण्या-जाण्याच्या प्रवासासाठी हे सवलतीचे तिकीटदर वैध आहेत. एअरलाइनच्या देशांतर्गत नेटवर्कमध्ये तसेच अबूधाबी, अॅम्स्टरडॅम-शिफोल, लंडन-हीथ्रो आणि पॅरिस चार्ल्स दी गोल या एअरलाइनच्या गेटवेजमध्ये प्रवास करण्यासाठी या सवलतीचा लाभ घेता येईल.

११ जानेवारी २०१९ म्हणजेच शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत एअरलाइनच्या सर्व बुकिंग चॅनल्समार्फत केलेल्या बुकिंग्जसाठी हा मेगा सेल उपलब्ध आहे. शिवाय, ग्राहक www.jetairways.com या एअरलाइनच्या वेबसाइटवरून किंवा मोबाइल अॅपवरून थेट बुकिंग करू शकतात आणि काही एक्स्लुजिव्ह लाभ मिळवू शकतात. यामध्ये प्रत्येक फ्लाइट बुकिंगवर २५० बोनस जेपीमाइल्स, बुकिंगनंतर २४ तासांच्या आत केलेल्या बदलांसाठी किंवा तिकीट रद्द करण्यासाठी शून्य रद्दीकरण किंवा परिवर्तन शुल्क, त्याचप्रमाणे वाढत्या प्रवासभाड्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी नाममात्र शुल्क भरून पसंतीचे भाडे लॉक करून ठेवण्याची सुविधा आदींचा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय प्रवास करणारे ग्राहक त्यांचा प्रवास तत्काळ सुरू करू शकतात, तर प्रीमिअर विभागातून देशांतर्गत प्रवास करणारे त्यांचा प्रवास १३ जानेवारी, २०१९पासून सुरू करू शकतात. इकॉनॉमी विभागात देशांतर्गत प्रवासासाठी बुकिंग करणारे प्रवासी २० जानेवारी, २०१९पासून प्रवास करू शकतात. देशांतर्गत तिकिटांना एक प्रगत खरेदी निर्बंध लागू आहे. त्यानुसार प्रीमिअर कॅबिनची तिकिटे प्रवास सुरू करण्याच्या किमान ०८ दिवस आधी बुक केली पाहिजेत, तर इकॉनॉमी विभागाची तिकिटे प्रवास सुरू करण्याच्या किमान १५ दिवस आधी बुक केली पाहिजेत.

भारतातील प्रवासी कोणत्याही ६६ देशांतर्गत ठिकाणी आणि थेट एअरलाइनद्वारे सेवा दिल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय ठिकाणी किंवा एअरलाइनच्या कोडशेअर पार्टनर्सद्वारे अॅम्स्टरडॅम आणि पॅरिस गेटवेजमार्फत पुरवल्या जाणाऱ्या सेवांच्या ठिकाणी या सेलचा लाभ घेऊन प्रवास करू शकतात. आखाती देशांतील प्रवासी या योजनेखाली भारत, आसिआन आणि सार्क देशांमध्ये प्रवास करू शकतात. ही मर्यादित काळासाठी असलेली ऑफर नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका येथील प्रवाशांनाही लागू असून, ते या ऑफरचा लाभ घेऊन भारत, आखाती देश, लंडन व मँचेस्टरसह युरोप व टोरोंटोला प्रवास करू शकतात. अतिपूर्वेकडील देशांतील पाहुणे भारत, आखाती देश, सार्क, अॅम्स्टरडॅम, लंडन, मँचेस्टर व पॅरिस येथे प्रवास करू शकतात. तर युरोप आणि टोरोंटोमधील पाहुणे भारतातील अनेकविध ठिकाणी प्रवास करण्यासाठी या सवलतीचा उपयोग करू शकतात.

*नियम व अटी लागू

जेट एअरवेजविषयी

जेट एअरवेज ही भारतातील आघाडीची आंतरराष्ट्रीय एअरलाइन असून, सध्या ती भारत व परदेशांतील ६६ ठिकाणी सेवा देते. जेट एअरवेजचे विस्तीर्ण जाळे भारताच्या सर्व बाजूंना पसरलेले आहे. महानगरे, राज्यांच्या राजधान्या व उदयोन्मुख ठिकाणी ही एअरलाइन सेवा देते.

भारताबाहेर, जेट एअरवेज आग्नेय आशिया, आखाती देश, युरोप व उत्तर अमेरिकेतील महत्त्वाच्या ठिकाणी सेवा देते. जेट एअरवेज समूह सध्या १२४ विमानांच्या ताफ्यासह सेवा देतो. यामध्ये बोइंग ७७७-३०० ईआर, एअरबस ए३३०-२००/३००, नवीन बोइंग ७३७ मॅक्स, नेक्स्ट जनरेशन बोइंग ७३७ आणि एटीआर ७२-५००/६०० यांचा समावेश होतो.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शरद पवार गटाच्या २५२ इच्छुकांच्या मुलाखती संपन्न

पुणे-आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार...

आता महात्मा गांधींचे नाव देखील हटविण्याचे कारस्थान -कॉंग्रेसचे आंदोलन

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) या...

महावितरण वीज कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक सुरक्षा साधने देणार- संचालक राजेंद्र पवार

शून्य अपघाताचे ध्येय : अत्याधुनिक सुरक्षा साधनांचे वीज कर्मचाऱ्यांसह...

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक धनकवडे उद्या करणार भाजपात प्रवेश

पुणे-केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार भीमराव तापकीर यांच्या...