~कंपनीने जाहीर केलेल्या बेंगळुरू–अॅमस्टरडॅम, चेन्नई–पॅरिस व मुंबई–लंडन या नव्या नॉन–स्टॉप आंतरराष्ट्रीय विमानसेवेचाही या ऑफरमध्ये समावेश~
मुंबई: जेट एअरवेज या भारतातील परिपूर्ण सेवा देणाऱ्या, प्रीमिअर आंतरराष्ट्रीय विमानकंपनीने कंपनीच्या देशांतर्गत जाळ्यातून युरोपला जाणाऱ्या प्रवाशांसाठी अॅमस्टरडॅम व पॅरिससाठीच्या विमानसेवेसाठी आज विशेष भाड्याची घोषणा केली*.
सप्टेंबर 15, 2017 रोजीच्या प्रवासासाठी लागू असलेल्या या विशेष ऑफरनुसार, प्रवाशांना जेट एअरवेजच्या संपूर्ण देशांतर्गत जाळ्यातील सर्व ठिकाणांहून अॅमस्टरडॅम व पॅरिसला जाण्यासाठी सर्वसमावेशक, वन-स्टॉप ‘फ्लॅट’ रिटर्न प्रवासाचे विशेष भाडे इकॉनॉमीसाठी 39,990 रुपये व प्रीमिअर प्रवासासाठी 99,990 रुपये भाडे आकारले जाईल.
ही मर्यादित कालावधीसाठीची ऑफर कंपनीच्या ऑक्टोबर 29, 2017 पासून, चेन्नई – पॅरिस (9W 128), बेंगळुरू – अॅमस्टरडॅम (9W 236) आणि मुंबई – लंडन हिथ्रो (9W 116) या दरम्यान सुरू होणार असलेल्या नव्या व आगामी नॉन-स्टॉप सेवांसाठी लागू असणार आहे.
कंपनीच्या देशांतर्गत जाळ्यातून कोठूनही सुरू होणाऱ्या विमानसेवेसाठी एकच भाडे आकारले जाणार असल्याने भारतातील उदयोन्मुख शहरांना युरोपशी जोडण्यासाठी मदत होणार आहे. विशेष भाडे असलेल्या तिकिटांची विक्री तातडीने सुरू होणार असून ती ऑगस्ट 10, 2017 पर्यंत सुरू राहणार आहे.
देशभरातील सर्व प्रवाशांना विमानसेवा सुरू होण्याचे ठिकाण कोणतेही असले तरी निश्चित स्वरूपाचे भाडे भरून आता कंपनीच्या देशांतर्गत जाळ्यातील कोणत्याही ठिकाणावरून मुंबई, दिल्ली, बेंगळुरू व चेन्नईमार्गे अॅमस्टरडॅम / पॅरिसला जाता येणार आहे. म्हणजेच, अमृतसर ते अॅमस्टरडॅम हा प्रवास पुणे ते पॅरिस यासारखाच असणार आहे.
दक्षिण भारतातून दिल्या जाणाऱ्या दोन नव्या थेट, नॉन-स्टॉप विमानसेवांचा समावेश या ऑफरमध्ये केल्याने एकाच आयटिनरीमार्फत प्रवाशांना युरोपला जाण्यासाठी व सोयीचे पर्याय देणारी व तेथून पुढे आपल्या युरोपातील सेवेद्वारे उत्तर अमेरिकेला सेव देणारी आणि व अन्य सेवेमार्फत परतीचा प्रवास करण्याची सोय देणारी ही एकमेव विमानकंपनी ठरणार आहे.