जेजुरी –छत्रपती शिवरायांच वक्तृत्व नेमक कस होत हे नेमके सांगता येणार नाही मात्र , शिवरायांच वक्तृत्व प्रभावीच असल पाहिजे कारण मावळे मातीसाठी मरायेला तयार झाले हे प्रभावी वक्तृत्वाशिवाय शक्यच नाही ,वक्तृत्व स्पर्धा म्हणजे बक्षिस मिळवणे नाही तर स्वतःला घडवणे म्हणजेच वक्तृत्व होय असे मत संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष तसेच शेकाप नेते प्रवीण गायकवाड यांनी व्यक्त केले. शिव्रराष्ट्र पुरंदर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यामंदिर यांच्या विद्यमाने यांच्या आयोजित “राजमाता जिजाऊ – क्रांतीज्योती सावित्री” राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घान आणि नवनिर्वाचित नगरसेवकांच्या स्वागत सोहळ्यात ते बोलत होते ,विध्यार्थ्यानी विविधांगी वाचन करून आपल्या ज्ञानात वाढ केली पाहिजे , वक्तृत्व कला लाख मोलाची आहे , वाचन करून त्यावर चिंतनातून आपली मते तयार केली , तर वक्तृत्वाला झळाळी प्राप्त होते , वक्त्यांनी समाजाचे प्रबोधन केले पाहिजे असेही मत यावेळी गायकवाड यांनी व्यक्त केले ,या वेळी जेजुरी नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगरध्यक्षा वीणाताई सोनवणे ,जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजयजी वाडेकर , पंचायत समिती सदस्य दत्ताशेठ झुरंगे ,भारतीय जनता पक्षाचे नेते गणपत कड , शेतकरी कामगार पक्षाचे नेते अजयसिंह सावंत , संदीप जगताप , जेजुरी पोलीस स्टेशनचे सह्ह्यक पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे , बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक सुनीलतात्या धिवार ,जिजामाता विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार सागर सर , शरदचंद्रजी पवार महाविद्यालयाच्या प्राचार्य सुषमाताई चाफळकर , पर्यवेक्षक दिलीप जगताप , हेमंत सोनवणे , तसेच नवनिर्वाचित नगरसेवक सचिनशेठ सोनवणे , महेश दरेकर , अरुण बारभाई , सुरेश सातभाई , अजिंक्य देशमुख ,गणेश शिंदे ,पौर्णिमा राउत , अमिना पानसरे ,सविता जगताप , साधना लाखे ,रुक्मिणी जगताप ,सुजाता झगडे ,वृषाली कुंभार ,जनता शिक्षण संस्थेचे सुभाष गारगोटे , नंदकुमार पाटील ,धनाजी वाबळे , सामाजिक कार्यकर्ते महादेव साधू जगताप , हरीभाउ रत्नपारखी ,शिवाजी जगताप , रत्नसिंह सावंत ,अजय जगताप ,राहुल मंग्वानी ,संतोष खोमणे ,संतोष हगवणे , अमोल काळाने ,पत्रकार राहुल शिंदे , भरत निगडे ,रमेश लेंडे सासवड येथील सागर जगताप , नंदू जगताप , गौरव जगताप आदी मान्यवर उपस्थित होते , यंदा या वक्तृत्व स्पर्धेचे 5 वे वर्ष होते , या स्पर्धेसाठी नागपूर ,बीड, चिपळूण ,औरंगाबाद , पुणे ,मुंबई अशा विविध ठिकाणाहून आलेल्या ४० पेक्षाही जास्त स्पेर्धाकानी सहभाग घेतला , व्याख्याते निलेश जगताप यांनी या वेळी बोलताना सांगितले कि हा नगरसेवकांचा स्वागत सोहळा एवढ्यासाठीच आहे कि सुरवातीला आम्ही तुमच स्वागत करतोय ते एवढ्यासाठीच आहे की, आमच तुमच्या कामावर लक्ष ठेवून आहोत , चुकला तर त्या विरुद्ध आवाज उठवायचा काम आम्ही करूच सोबतच आपल्या चांगल्या कामाचे सुद्धा कौतुक करण्याचे काम आम्ही करू , स्पर्धेचा सविस्तर निकाल – प्रथम क्रमांक विभागून रोहित देशमुख ( सोलापूर ) आणि निखील नगरकर ( अहमदनगर ) , द्वितीय क्रमांक विभागून अफसर शेख ( अहमदनगर ) आणि सागर मदने ( पुणे ), तृतीय क्रमांक ऐश्वर्या भद्रे (मुंबई ) आणि जितेंद्र पवार ( औरंगाबाद ) तर उत्तेजनार्थ पारितोषिके अनुक्रमे नामदेव गुलपहाड, सतीश कांबळे ,वर्षा जाधव , चैत्राली विसपुते ,प्रवीण जगताप यांना आणि तालुकास्तरावर उर्मिला निगडे , श्रुती झेंडे , सुरज गदादे यांना पारितोषिके देण्यात आली , परीक्षक म्हणून प्रा.बालाजी नाटकर , प्रा.संगीता रिकामे, प्रा.पोपटराव ताकवले यांनी काम पहिले , पारितोषिक वितरण मार्तंड देव संस्थानचे विश्वस्त सुधीर गोडसे ,नीरा कृषी उत्पन बाजार सामितिचे संचालक धनंजय भोईटे , पत्रकार नितीन राऊत , दिलीप जगताप , कुमार गावडे ,शिवाजी जगताप , प्रो.राजकुमार रिकामे या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन प्रसिद्ध व्याख्याते निलेश जगताप, प्रा.पोपटराव ताकवले , विक्रमराजे शिंदे , राहुल थोपटे , अक्षय शिवरकर , प्रतिक वखरे , सनी बारसुडे ,शेखर जाधव , अक्षय चाचर , भूषण कापरे , निखील जगताप, गिरीश झगडे , अजय पठाण , शुभम बारसुडे ,सुरेश साबळे ,असिफ मुजावर , आकाश लेंडे , नागेश घोडके यांनी केले , प्रसिद्ध व्याख्याते निलेश जगताप यांनी प्रास्ताविक केले , अक्षय चाचर यांनी सूत्रसंचालन केल आणि सनी बारसुडे यांनी आभार मानले ..
वक्तृत्व स्पर्धा म्हणजे बक्षिस मिळवणे नाही तर स्वतःला घडवणे होय – प्रवीण गायकवाड
Date:

