पुणे :
दिवाळी निमित्त जय महाराष्ट्र मंडळाच्या वतीने कारगील युध्दात तसेच सीमेवर लढताना हौतात्म्य पत्करणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबियांचा सन्मान अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ,अभिनेता संतोष जुवेकर यांच्या हस्ते करण्यात आला.या कृतज्ञता सोहळ्यात जलसंधारणाच्या कामाबद्दल कर्नल सुरेश पाटील,शाळा तसेच फँड्री चित्रपटांचे निर्माते निलेश नवलखा,पालखी विठोबा ट्रस्ट चे अध्यक्ष तेजस कोंढरे यांचाही सन्मान करण्यात आला.
तेजस कोंढरे,निलेश नवलखा यांचा वाढदिवस केक कापून ,औक्षण करून साजरा करण्यात आला.
दिवाळी पाडव्याच्या सायंकाळी पालखी विठोबा चौक येथे हा कार्यक्रम झाला.चांगली कामगिरी बजावणाऱ्या पोलिसांचा,व्यापाऱ्यांचा ,ज्येष्ठ नागरिकांचा सन्मानही यावेळी करण्यात आला.
“सीमेवर लढणाऱ्या सैनिमांच्या कुटुंबीयांचा,आणि सीमेंतर्गत चांगली कामगिरी बजावणाऱ्या पोलिसांचा दिवाळीत सन्मान करण्याचा उपक्रम अनुकरणीय आहे.प्रत्येकाने आपल्या ठिकाणी सचोटीने काम करणे हीच आज देशभक्तीची व्याख्या ठरू शकते ‘ असे प्रतिपादन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी यावेळी केले.”समाजातील ज्येष्ठांचा आणि श्रेष्ठांचा सन्मान ह चांगला पायडा आहे’ असे संतोष जुवेकर यावेळी म्हणाले.
युध्द करण्याचा सल्ला अनेकजण देताना दिसत असले तरी युध्द व्यवहार्य नाही ‘ असे कर्नल सुरेश पाटील यांनी सांगीतले.
कर्नल विजय कौशिक,कर्नल चंद्रशेखर चिंचोलीकर ,माजी नगरसेविका कल्पना जाधव,राजेश येनपुरे,नगरसेवक अशोक येनपुरे,मामा देशमुख,,राजु परदेशी,सागर शिंदे,प्रमोद कोंढरे महिलावर्ग आणि ज्येष्ठ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



