रसिक मोहिनी या संस्थेच्या ‘जन्मरहस्य’ या नाटकाचा रौप्यमहोत्सवी प्रयोग आज बालगंधर्व रंगमंदिरात संपन्न झाला . कुमार सोहोनी या नाटकाचे दिग्दर्शक असून , अमिता खोपकर , भाग्यश्री देसाई ,वसुधा देशपांडे , गुरुराज अवधानी , अजिंक्य दाते यांच्या या नाटकात भूमिका आहेत .