नागपूर: आयटीएम कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, नागपूरतर्फे आंतर-महाविद्यालयीन
टेक्निकल फेस्टिव्हल “टेक्नोव्हिजन २०१६”चे आयोजन करण्यात आले़. हा एक तंंत्रज्ञानाचा सोहळा
ठरला, अभियांत्रिकी शाखांची पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी यामध्ये आपले प्रकल्प सादर केले़.
आरटीएम , नागपूर विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयातील २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला़.
प्रकल्प सादरीकरण, पोस्टर्स, टेक्निकल पेपर सादरीकरण यामध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल,
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम, सिव्हिल अशा विविध शाखांच्या विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य सादर
केले़. हैद्राबाद येथील जेएनटीयूचे विद्यार्थीही यामध्ये सहभागी झाले होते़.
आयटीएम टेक्नोव्हिजन २०१६चे उद्घाटन थाटामाटात झाले़. आरटीएम नागपूर विद्यापीठाच्या
महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. डी़. के़. अग्रवाल प्रमुख पाहुणे म्हणून तर,
विद्यापीठाच्या टेक्नालॉजी विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ़ डी़ एम़ चौधरी सन्माननीय अतिथी म्हणून
उपस्थित होते़. यावेळी बोलताना डॉ़ अग्रवाल यांनी प्रकल्पाधारित शिक्षणपद्धतीतील प्रयत्नांबद्दल
आयटीएम कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगचे कौतुक केले़. डॉ़ चौधरी यांनी प्रकल्प सादर करणाऱ्या
आणि स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले़. ते म्हणाले, विद्यार्थी हाच आरटीएम
विद्यापीठाचा केंद्रबिंदू आहे़. त्यांच्याशी संवाद साधताना आनंद झाला़. प्राचार्य डॉ़ हेमंत हजारे यांनी
विद्यार्थ्यांचे टेक्नोव्हिजनमधील मोठ्या संख्येने सहभागी झाल्याबद्दल अभिनंदन केले आणि पुढील
वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या़. विद्यार्थ्यांनी सदैव आपल्या सामाजिक जबाबदारीचे भान ठेवावे,
असा संदेश दिला़. टेक्नोव्हिजनचे समन्वयक डॉ़ अरविंद बोधे यांनी विद्यापीठ स्तरावर आयोजित
करण्यात आलेल्या या स्पर्धांमागील भूमिका सांगितली़.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा टेक्नोव्हिजनला प्रतिसाद वाढल्याचे पहायला मिळाले़. त्याबरोबरच
विद्यार्थ्यांच्या सामाजिक बांधिलकीच्या आविष्काराने सर्वांना आनंदित केले़. आयटीएम कॉलेजने
नागपूर जिल्ह्यातील आणखी चार गावे दत्तक घेतली़. कम्पटी परिसरातील गावे पाच वर्षांसाठी
दत्तक घेण्यात येणार आहेत़. तंंत्रज्ञानाच्या मदतीतून गावाचा विकास करण्याचा प्रकल्प याठिकाणी
राबविण्यात येणार आहे़.
गावातील वंचितांचे जीवनमान उंचावण्यासाठी एकाचवेळी बहुपयोगी प्रकल्प विद्यार्थ्यांकडून सुरू
करण्यात येणार आहेत़. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रबंधांमधील
कौशल्य आणि ज्ञानाचा उपयोग ते या गावांसाठी करणार आहेत़. त्यासाठी विद्यार्थी आणि
प्राध्यापक यांच्याकडून विविध उपक्रम राबविण्यात येतील़. यामध्ये पाण्याचा दर्जा तपासणे,
सांडपाणी व्यवस्थापन, सौर उर्जेचा वापर, अंतर्गत हवेचे प्रदूषण कमी करणे अशा उपक्रमांचा
समावेश असेल़. संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांकडून त्याचे परिक्षण करण्यात येईल़. घोरपड शिवाय
अजाणी, शिरपूर, गढा आणि पवनगाव ही चार गावे दत्तक घेण्यात येणार आहेत़. अजाणीच्या
सरपंच मालाताई इंगोले या टेक्नोव्हिजन 2016साठी उपस्थित होत्या़. पाहुण्यांच्या हस्ते त्यांचा
सत्कार करण्यात आला़.
महाविद्यालयांमध्ये चौथ्या वर्षातील विद्यार्थ्यांना प्रकल्प सादर करण्यास सांगितले जाते़, मात्र
आयटीएममध्ये दुसऱ्या वर्षांतील विद्यार्थ्यांनीही प्रकल्प सादर केले होते़.
मागील वर्षी, आयटीएमच्या विद्यार्थ्यांनी पाण्यावरील प्रक्रिया प्रकल्प, सौर उर्जा, रेफ्रिजरेटर आणि
एसीची कार्यक्षमता वाढविणे या प्रकल्पांवर सर्वोत्त्तम संशोधन प्रबंध सादर केले होते़, हेच प्रकल्प
आता दत्तक गावांमध्ये प्रत्यक्षात येणार आहेत़.
आयटीएम ग्रुप आॅफ इन्स्टिट्युशनचे संचालक डॉ़ मिलिंद कुलकर्णी म्हणाले, अभियांत्रिकीच्या
शिक्षणामध्ये प्रकल्प आधारित शिक्षणाला गती देण्याची दूरदृष्टी संस्थेचे अध्यक्ष डॉ़ पी़ व्ही़ रमणा
यांनी जोपासली होती़. या योजनेखाली त्यांनी अनेक प्रकल्पांना मदत केली़. ते आता हेच प्रकल्प
सभोवतीच्या गावांमध्ये घेउन जाउ इच्छितात़. त्यातून त्यांना तंत्रज्ञानाची मदत मिळेल़. यापूर्वी
आम्ही घोरपड हे गाव दत्तक घेतले आहे़.