पुणे- इंटरनॅशनल स्कूल आॅफ बीझनेस अॅण्ड मिडीयाच्या र्काॅन्स्टिट्यूएन्ट आॅफ पीपलस् एमपाॅवरमेंट ग्रुप तर्फे दोन दिवसीय वार्षिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. नुकतीच ही परिषद झाली. एचआरमध्ये अस्तित्वात असलेल्या मॉडेल, आणि धोरणे या थीमवर ही परिषद होती.
आयएसबी अॅण्ड एम एचआर शेअर भारतातील आघाडीचे एचआर एकाच प्लॅटफाॅर्मवर
यावेळी परिषदेचे अध्यक्ष म्हणून डाॅ. प्रमोद कुमार उपस्थित होते. तसेच सिटी बॅँकेच्या सीएचआरओ साऊथ एशियाच्या एमडी अनुरंजित कुमार, लॅँडमार्क ग्रुपचे अध्यक्ष बी. व्यंकटरामाना, कपॅबीलीटी बिल्डींग एचपीसीएलचे जीएम डाॅ. आशिष सेन उपस्थित होते.
जवळपास ३० अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यामध्ये सहभागी झाले होते. एचआरमधील आव्हाने आणि समस्या यावर चर्चा करण्यात आली. एचआर शेअरच्या माध्यमातून सर्वांना एकाच ठिकाणी यामधील नियम, प्रक्रिया माहिती करून घेण्यासाठी एक प्लॅटफाॅर्म उपलब्ध करून देण्यात आला. माजी मिसेस इंडिया फराह अन्वर हिने मार्गदर्शन केले व तिचा आतापर्यंतचा प्रवास उलगडून सांगितला.
ड्युत्शे बँक, एमआरएफ, जेएसडब्लू एनर्जी, मॉर्गन स्टॅन्ले आणि इतर नामवंत कंपन्यांचे स्पीकर्स उपस्थित होते. कॅपस्टोन आणि स्कोडा कंपनी याचे प्रायोजक होते.