आयएनएस सुमेधने बाली, इंडोनेशियाला भेट दिली

Date:

नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2022

भारतीय नौदलाच्या आग्नेय हिंदी महासागरामधील लांब पल्ल्याच्या तैनातीचा भाग म्हणून, आयएनएस सुमेध, 04 ऑगस्ट ते 06 ऑगस्ट 2022 या कालावधीत, बाली येथील तान्जुंग बेनोआ बंदराच्या भेटीवर आहे. भारताचा स्वातंत्र्य दिवस आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी हे जहाज ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे जात आहे. बाली भेटीमागे द्विपक्षीय संबंध बळकट करणे, लष्करी सहकार्य वाढवणे आणि इंडोनेशियाच्या नौदलाबरोबरची परस्पर कार्यक्षमता सुधारणे हे उद्दिष्ट आहे. बाली येथील वास्तव्यात जहाजाचे कर्मचारी इंडोनेशियन नौदलाच्या त्यांच्या समकक्षांबरोबर  व्यावसायिक संवाद, क्रॉस-डेक भेटी आणि क्रीडा-उपक्रमांमध्ये सहभागी होतील.  

बालीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी, जहाजाने 02 ऑगस्ट 2022 रोजी इंडोनेशियन नौदलाचे सिग्मा क्लास कॉर्वेट केआरआय सुलतान हसनुद्दीन यांच्याबरोबर सागरी भागीदारीचा सराव केला. या सरावामध्ये आरमारी नवनिर्मिती, सामरिक तंत्र आणि दळणवळण प्रक्रियांचा समावेश होता, ज्यामुळे दोन्ही नौदलांमधील व्यावसायिक अनुभवांची देवाणघेवाण आणि सागरी सहकार्य मजबूत करण्याची संधी मिळाली.

आयएनएस सुमेध हे नौदलाचे भारतीय बनावटीचे खोल समुद्रात गस्त घालणारे जहाज असून स्वतंत्रपणे विविध भूमिका बजावण्यासाठी तसेच अन्य सागरी मोहिमांच्या सहाय्यासाठी ते तैनात आहे. हे जहाज विशाखापट्टणम येथील भारतीय नौदलाच्या पूर्व तळाचा एक भाग आहे आणि पूर्व नौदल मुख्यालयाच्या फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफच्या आदेशाखाली ते काम करते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राहुल गांधींना धमकी देणाऱ्या राज आमेरावर कारवाईची मागणी: काँग्रेसचे निषेध आंदोलन

पुणे: शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बालगंधर्व चौकात निषेध...

आता २२ राज्यांमध्ये नागरिकत्व सिद्ध करावे लागणार,एसआयआर,बोगस मतदारांना वगळणार

पुणे (prab)- तब्बल २१ वर्षांनंतर नव्याने मतदार यादी तयार होणाऱ्...

पुण्यात एकाच वेळी मुळा, मुठा, खडकवासला धरणासह एकूण ४२ ठिकाणी जल स्वच्छता मोहीम

संवर्धनाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचा सशक्त उपक्रम: ‘प्रोजेक्ट अमृत’चा...

भिवंडी महापौर निवडणुकीत बंडखोरी करणा-यांवर कारवाई:भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची घोषणा

भिवंडी: भिवंडी निजामपूर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या पक्षादेशा (व्हीप) विरोधात...