Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे नेते, आमदार प्रविण दरेकर यांची बिनविरोध निवड

Date:

मुंबई, दि. ५ ऑगस्ट- मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आज झालेल्या निवडणुकीत भाजपचे नेते, आमदार प्रविण दरेकर यांची बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी सिध्दार्थ कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची सभा आज पार पडली. या सभेमध्ये २०२२-२३ ते २०२५-२६ या कालावाधीकरिता प्राधिकृत अधिकारी कैलास जेबले यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पार पडली. या निवड प्रक्रियेत भाजपचे नेते व आमदार प्रविण दरेकर यांची अध्यक्षपदी तर सिध्दार्थ कांबळे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
अध्यक्षपदाच्या निवडीनंतर प्रसिध्दीमाध्यमांशी बोलताना प्रविण दरेकर यांनी सांगितले की, सहकारामध्ये एखादी संस्था चालवित असताना तिची सर्वार्थाने उन्नती होण्यासाठी सर्व सहका-यांनी सर्वांनी एकोप्याने व एकत्रितपणे काम करावे लागते हा सहकाराचा खरा मूलमंत्र आहे. गेली सुमारे २० वर्ष नलावडे साहेब, कांबळे साहेब आम्ही सारी मंडळी सहकारात एकत्रितपणे काम करत आहोत. कुठल्याही पक्षाचे सरकार असले तरी यापूर्वी बँकेचे नेतृत्व करताना आज बँक सर्वांच्या प्रयत्नातून दहा हजार कोटी पर्यंत आम्ही एकत्रितपणे आणली आहे. निवडणुकीच्या काळात थोड्याफार काही गोष्टी झाल्या होत्या, परंतु शेवटी आमचा स्नेह एवढा घट्ट आहे की पुन्हा त्या सगळ्या दुरुस्त्या करत शिवाजीराव नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे आमदार प्रसाद लाड, सुनील राऊत सगळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माझ्यावर पुन्हा जबाबदारी सोपविली. माझ्यासोबत सिद्धार्थ कांबळे यांनी काम करावं अशी मी अपेक्षा व्यक्त केली. कारण शेवटी वेळ देणं काम करणं व यासाठी चांगला साथीदार आवश्यक आहे, तरच आपल्याला संस्थेची योग्य पध्दतीने वाढ करता येते. सिध्दार्थ कांबळे त्यांनीही ही विनंती मान्य केली. असेही दरेकर यांनी सांगितले.
राजकारणात पक्षापलीकडे मैत्री आणि संबंध असतात आणि मला वाटते ते गैर असण्याचं काहीच कारण नाही. त्यामुळे बँकेच्या हितासाठी जर पक्षापलीकडे जाऊन आम्ही एकत्र आल्यामुळे मुंबईतल्या आमच्या सगळ्या सहकारी कार्यकर्त्यांना सुद्धा याचा प्रचंड आनंद झाल्याचे आपल्याला दिसून येईल असे प्रविण दरेकर यांनी सांगितले.
सहकारामध्ये कुठल्याही पक्षाचे चिन्ह नसते. सहकारामध्ये विविध पक्षांचे कार्यकर्ते अनेक जिल्हा बँकांमध्ये काम करताना दिसतात. सहकारामध्ये एकत्रित काम करुन वाटचाल करायची असते. म्हणूनच आजची निवड ही बिनविरोध झाली. आज सरकारच्या माध्यमातून बँकेला सहकार्य होईल, तसेच बँकेची प्रगती अधिक ताकदीने होईल. हा विचार फार महत्त्वाचा असून हाच विचार सहकारात जोपासला गेला पाहिजे असेही दरेकर यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सरन्याधीश भूषण गवईंचा प्रोटोकॉल न पाळून भाजपा युती सरकारकडून अपमान, आंबेडकरी विचारांचे असल्याने अपमान केला का? : नाना पटोले

सरन्यायाधिशांचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर राज्य सरकार काय कारवाई करणार. राज्य...

पॉलिटेक्निक प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया २० मे पासून सुरू

पदविका अभ्यासक्रम नोकरी व उद्योगासाठी उपयुक्त पर्याय; अधिकाधिक विद्यार्थ्यांनी...