मुंबई महापालिका, प्रशासन यांच्या बेपर्वाईचे निष्पाप बळी -विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (व्हिडीओ)

Date:

विक्रोळी, भांडुप व चेंबूर येथील दुर्घटनास्थळी दिली भेट
मुंबई, दि. १८ जुलै- विक्रोळी, भांडुप व चेंबूर या तिन्ही ठिकाणी संरक्षक भिंत पडण्याच्या घटनेला मुंबई महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयाचा निष्काळजीपणाचा कारणीभूत आहे. महापालिका व प्रशासन यांनी जबाबदारीने वेळीच योग्य कार्यवाही केली असती तर आज हे निष्पाप जीव वाचू शकले असते. परंतु महापालिकेने बांधलेली निकृष्ट दर्जाची संरक्षक भिंत या दुर्घटनेला कारणीभूत आहे. त्यामुळे या दुर्घटनेची उच्चस्तरिय चौकशी करण्यात यावी व या दुर्घटनेला कारणीभूत असलेल्या दोषींविरुध्द कठोर कारवाई करण्याची मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केली. तसेच मुंबई परिसरात ज्या भागात अश्या प्रकारच्या संरक्षक भिंती बांधल्या आहेत त्याठिकाणच्या रहिवाश्यांची सुरक्षिततेची व्यवस्था तात्काळ महापालिकेने करावी, अन्यथा मुंबईतील पावसाळ्यामुळे अन्य ठिकाणीही मोठी दुर्घटना घडू शकते असा इशाराही दरेकर यांनी यावेळी दिला.


विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी पावसात आज विक्रोळी येथील सूर्यानगर, भांडुपमधील मुन्शी महल परिसर व चेंबूरमधील भारतनगर येथील घटनास्थळी भेट देऊन मदत कार्याचा आढावा घेतला.तसेच त्या दुर्घटनाग्रस्त नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या. विक्रोळी येथील दुर्घटनेत अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहेत. काही कुटुंबातील मुले-मुली अनाथ झाले आहेत. अश्याच एका कुटुंबाचीही दरेकर यांनी भेट घेतली. या कुटुंबातील लहान भाऊ-बहिण अनाथ झाली आहेत. त्यांचे सात्वंन करताना दरेकर यांना गहिवरुन आले व ते शोकाकुल झाले. या पोरके झालेल्या या कुटुंबातील लहान भाऊ-बहिण यांच्या शिक्षणाची जबाबदारी भाजापातर्फे उचलण्यात येईल असे वचन त्यांनी त्या कुटुंबाला दिले व या कठिण परिस्थितीतही धीर देण्याचा प्रयत्न दरेकर यांनी केला. यावेळी भाजापाचे खासदार मनोज कोटक उपस्थित होते.
विक्रोळी,भांडुप,चेंबूर सारख्या दुर्घटना भविष्यात घटना घडू नयेत यासाठी राज्य सरकार व मुंबई महापालिका यासारख्या यंत्रणांनी तातडीने उपाययोजना कराव्यात. निष्पाप मुंबईकरांचे बळी रोज जात आहेत. असा एकही पावसाळा नाही गेला ज्यामध्ये मुंबईकरांनी बळी पाहिले नाहीत. प्रशासन व महापालिका यांच्या बेजबाबदारपणाचे हे बळी असल्याचा आरोप करतानाच दरेकर म्हणाले की, मुंबईत मुसळधार पाऊस पडल्यानंतर गेली वर्षोनुवर्षे पाणी तुंबण्याची ठिकाणे तीच तीच आहेत. तरीही पालिका हे थांबविण्यासाठी काहीही ठोस व कायमस्वरुपी यंत्रणा उभी करत नाही. विक्रोळीची भिंत जी पडली ती पूर्वीही पडली होती, ती पुन्हा बांधली. पण त्यावेळी निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाले. त्यामुळे रहिवाश्यांचा नाहक बळी गेला. जे बळी गेले त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी आता तरी कडक उपाययोजना करा, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
मुंबईकरांचे आणखी बळी घेऊ नका. आता केवळ पालिकेने धोक्याची नोटीस बजावून त्यांची जबाबदारी सुटत नाही. त्या रहिवाश्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्याची जबाबदारीही मुंबई महापालिकेची आहे. नोटीस लावून प्रश्न सुटतो का? त्यांना पर्यायी घरे कोण देणार असा सवाल करतानाच दरेकर म्हणाले की, माणूस आपला जीव गेला तरी चालेल पण आपले छोटे घर का सोडत नाही, कारण ते घर त्यांच्या मेहनतीने घेतलेले असते आणि दुसरी पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे जीव मुठीत घेऊन त्याला राहावे लागते. जर आपण पालिका व प्रशासनाने त्यांची पर्यायी व्यवस्था केली तर लोक त्या ठिकाणी नाही मरणार. आता या प्रकरणाची चौकशी समिती लावली जाईल. आठ दिवसांनी सगळे शांत होईल. तथापि या दुर्घटनेची चौकशी व्हावी आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणीही दरेकर यांनी केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला, अनेकांचा मृत्यू

पाकिस्तानच्या लष्कराने रविवारी पहाटे अफगाणिस्तानच्या सीमेवरील भागात हवाई हल्ला...

बदलापुरात ‘स्त्री बीज’ तस्करी टोळीचा पर्दाफाश:सूत्रधारासह तिघी गजाआड.

बदलापूर : येथे आंतरराज्यीय स्त्री बीज (एग सेल)...

बुधवार पेठेतील पापा शेख उर्फ बाबू भैय्या टोळीचा पर्दाफाश

पुणे: मानवी तस्करी, बोगस भारतीय ओळखपत्रे, जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणे,...

‘कुरकुरे’ देण्याचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; पुणे रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

माणुसकीला काळीमा फासतेय पुण्यातील गुन्हेगारी.. पुणे :कुटुंबीयासोबत प्लॅट फॉर्मवर...