एज सिरॅमिक कलेक्शनमधील नवी प्रस्तुती
घड्याळे बनवणारी, भारतातील सर्वात विश्वसनीय कंपनी टायटनने आपल्या एज सिरॅमिक कलेक्शनमध्ये ‘एज स्क्वर्कल’ सादर करून आपला वॉच पोर्टफोलिओ अधिक मजबूत केला आहे. मिनिमलिस्टिक डिझाईनपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेल्या एज स्क्वर्कलची केस फक्त ४.४५ एमएमची असून याचा एकंदरीत लूक अतिशय सुबक, आधुनिक आणि शानदार आहे. एज स्क्वर्कलच्या किमती ३९,९९५ रुपयांपासून पुढे असून त्यामध्ये काळा व पांढरा अशा रंगात दोन युनिसेक्स प्रकार उपलब्ध आहेत. एज स्क्वर्कल हे घड्याळ नाही तर एक होरोलॉजिकल चमत्कार आहे, अतिशय बारकाईने करण्यात आलेल्या मोहक स्टायलिंगच्या कौशल्याचे हे सर्वोत्तम उदाहरण आहे.
ड्युअल टोनमध्ये स्क्वर्कल आकाराच्या डायलसह ही घड्याळे अतिशय अनोखा व शानदार लुक निर्माण करतात. डायलच्या वर असलेले सफायर क्रिस्टल ग्लास कव्हर घड्याळाला क्लासिक अपील मिळवून देते. घड्याळ सिरेमिक केसने वेढलेले असून याचा पट्टा देखील सिरॅमिक आहे जो मनगटावर अतिशय खुलून दिसतो आणि त्यामुळेच हे घड्याळ अजूनच शानदार दिसते. पट्टा लॉक करण्यासाठी एक छोटा क्राऊन आणि बटरफ्लाय क्लास्प दिलेला असल्याने घड्याळ मनगटावर अतिशय आरामदायी ठरते. साधेपणातून सुबकतेची शानदार अनुभूती देणारी ही घड्याळे दिवसभर तुमची परफेक्ट स्टाईल पार्टनर बनू शकतात.
टायटन एजमध्ये एज सिरॅमिक कलेक्शनअंतर्गत पुरुष व स्त्रिया दोघांसाठी देखील ८ शानदार घड्याळे आहेत ज्यांच्या किमती १९,९९५ रुपयांपासून २९,९९५ रुपयांपर्यंत आहेत. पुरुषांच्या कलेक्शनमध्ये चारकोल ब्लॅक, अटलांटिक ब्ल्यू, आर्क्टिक व्हाईट, मिडनाईट गोल्ड आणि ग्रे असे आकर्षक रंग उपलब्ध आहेत.
२००२ साली सुरु करण्यात आलेल्या टायटन एजमध्ये एज सिरॅमिक, एज मेकॅनिकल अशी अनेक उत्तमोत्तम, शानदार घड्याळे सादर करण्यात आली आहेत. सर्वात स्लिम एज घड्याळांमध्ये टायटन एज कायम अग्रेसर आहे. या ब्रँडने आपल्या आजवरच्या वाटचालीत ३.५ एमएम ते ४.५ एमएम आणि १.१५ एमएम टी९०८१बी क्वार्ट्झ कॅलिबरचा अतुलनीय थिकनेस (घड्याळाची जाडी) साध्य केला आहे. टायटन एज घड्याळे ३० मीटरपर्यंत खोल पाण्यात देखील उत्तम कामगिरी बजावू शकतात.