शेतकरी आणि कृषी-संस्थांनी दिलेल्या योगदानाची घेतली दखल
नवी दिल्ली, २० सप्टेंबर २०२२: महिंद्रा समूहाचा एक भाग आणि एक अग्रगण्य भारतीय ट्रॅक्टर ब्रँड स्वराज ट्रॅक्टर्स यांनी आज नवी दिल्ली येथे आयोजित कृषी परिषदेत स्वराज पुरस्कार २०२२ च्या चौथ्या सोहळ्याचे आयोजन केले.
या परिषदेमध्ये माननीय केंद्रीय कृषी मंत्री श्री. नरेंद्र सिंह तोमर यांच्या उपस्थितीत स्वराजने २०२१-२०२२ मध्ये कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल शेतकरी आणि कृषी संस्थांचा सन्मान केला. यावेळी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी स्वराज ट्रॅक्टर्सने दिलेल्या योगदानाचीही दखल घेण्यात आली. यावेळी बोलताना श्री. तोमर यांनी कृषी क्षेत्राला विशेषत: लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदत करण्याच्या भारत सरकारच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला.

भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) आणि भारत सरकारचे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शेतीचे यांत्रिकीकरण आणि शेतीमधील तंत्रज्ञानाचा वापर’ या विषयाच्या अनुषंगाने दिवसभराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
आपल्या मुख्य भाषणादरम्यान स्वराज विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. हरीश चव्हाण म्हणाले, “भारताच्या आर्थिक वाढीसाठी कृषी क्षेत्र महत्त्वपूर्ण आहे आणि लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांची उत्पादकता आणि उत्पन्न वाढविण्यात यांत्रिकीकरण आणि अॅग्रीटेकची भूमिका महत्त्वाची आहे. भारतीय कृषी क्षेत्राला आत्मनिर्भर बनवून एकूण उत्पादकता वाढविण्यासाठी भारतीय शेतजमिनींवर शाश्वत, परवडणारे आणि सुलभ कृषी यांत्रिकीकरण याचा आपण अवलंब केला पाहिजे.”
श्री. चव्हाण पुढे म्हणाले, “स्वराज ट्रॅक्टर्समध्ये आमचा ‘ट्रान्सफॉर्म फार्मिंग आणि एनरिच लाईव्ह्स’ या आमच्या उद्देशावर ठाम विश्वास आहे आणि स्वराज पुरस्कार केवळ केलेल्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठीच नव्हे तर या क्षेत्राच्या गरजा आणि प्रश्नांवर चर्चा आणि प्रकाश टाकण्यासाठीही एक व्यासपीठ म्हणून काम करतात. आम्हाला शेतकरी आणि त्यांच्या समुदायांपर्यंत थेट पोहोचण्याची संधी यामुळे मिळते.”
भारताला ‘आत्मनिर्भर’ बनवण्यासाठी सक्षम, परवडणाऱ्या आणि सुलभ तंत्रज्ञानासह शेतकऱ्यांना सक्षम करण्यासंबंधी विविध कृषी विषयांवर पॅनेल चर्चा आणि तांत्रिक सत्रांमध्ये सहभागी झालेल्या कृषी क्षेत्रातील विविध मान्यवर आणि प्रमुख सरकारी अधिकाऱ्यांनाही स्वराज पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
स्वराज पुरस्कार विजेत्यांची यादी व्यक्ती | ||
पुरस्कार विभाग | स्थळ | व्यक्ती |
केव्हीके यादी | ||
उत्कृष्ट केव्हीके | गुमला, झारखंड | डॉ. संजय कुमार |
उत्कृष्ट केव्हीके | महेंद्रगढ, हरयाणा | डॉ. रमेश कुमार |
उत्कृष्ट केव्हीके | कुचबेहार, पश्चिम बंगाल | डॉ. बिकाश रॉय |
उत्कृष्ट केव्हीके | बाराबंकी, उत्तर प्रदेश | डॉ. शैलेश सिंग |
एफपीओज यादी | ||
उत्कृष्ट एफपीओ | उडुपी कालपरसा कोकोनट अँड ऑल स्पाईसेस प्रॉडयूसर कंपनी लिमिटेड | श्री सत्यनारायण उडूपा. बी |
उडुपी, कर्नाटक | ||
उत्कृष्ट एफपीओ | कझानी फार्मर्स प्रॉडयूसर कंपनी लिमिटेड, एरोड, तामिळनाडू | श्रीमती के. पी. कविथा |
उत्कृष्ट एफपीओ | लवकुश अॅग्रो प्रॉडयूसर कंपनी लिमिटेडपूर्व चंपारण, बिहार | श्री परमानंद पांडे |
उत्कृष्ट एफपीओ | श्री कृष्ण उत्पादनमुखी क्रिसकाक समिती सिवसागर, आसाम | डॉ. खनिंद्र देव गोस्वामी |
श्री कृष्ण उत्पादनमुखी क्रिसकाक समिती | ||
शास्त्रज्ञांची यादी | ||
उत्कृष्ट शास्त्रज्ञ | आयसीएआर – नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिटयूट, कर्नाळ डॉ. नरेश सेळोकर शास्त्रज्ञ, प्राणी विज्ञान | डॉ. नरेश सेळोकर शास्त्रज्ञ, प्राणी विज्ञान |
उत्कृष्ट शास्त्रज्ञ | क्रॉप प्रॉडक्शन डिव्हिजन आयसीएआर – नॅशनल राईस रिसर्च इन्स्टिटयूट, कटक ओडिशा | डॉ. राहुल त्रिपाठी, वरिष्ठ शास्त्रज्ञ |
उत्कृष्ट शास्त्रज्ञ | डिव्हिजन ऑफ जेनेटिक्स आयसीएआर- आयएआरआय, नवी दिल्ली | डॉ. प्रोलय कुमार भौमिक शास्त्रज्ञ |
उत्कृष्ट शास्त्रज्ञ | आयसीएआर इंडियन इन्स्टिटयूट ऑफ व्हेजिटेबल रिसर्च पोस्ट बॅग नं.१ पी. ओ. जाखीनी (शाहनशापूर), वाराणसी | डॉ. प्रदीप करमरकर शास्त्रज्ञ |
आयसीएआर इन्स्टिटयूट/ कृषी विद्यापीठे यादी | ||
उत्कृष्ट संस्था | आयसीएआर- नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ अॅनिमल न्यूट्रिशन अँड फिजीओलॉजी, बंगळुरू | डॉ. राघवेंद्र भट, संचालक |
उत्कृष्ट संस्था | आयसीएआर- इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मिलेट्स रिसर्च, हैद्राबाद | डॉ. बी दयाकर राव |
उत्कृष्ट संस्था | आयसीएआर- सेंट्रल इन्स्टिटयूट ऑफ फ्रेशवॉटर अॅग्रिकल्चर, भुवनेश्वर | डॉ. सरोज कुमार स्वेन |
उत्कृष्ट संस्था | गोविंद बल्लभ पंत युनिव्हर्सिटी ऑफ अॅग्रिकल्चर अँड टेक्नॉलॉजी, पंतनगर | डॉ. एम. एस. चौहान, व्हीसी |
फार्मर कॉपरेटीव्ह्ज | ||
उत्कृष्ट फार्मर कॉपरेटीव्ह्ज | ओडिशा स्टेट कॉपरेटीव्ह बँक, भुवनेश्वर, ओडिशा | श्री. संजीव चढा, अध्यक्ष |
उत्कृष्ट फार्मर कॉपरेटीव्ह्ज | प्रायमरी अॅग्रिकल्चर क्रेडिट सोसायटी, सिक्का, पश्चिम चंपारण, बिहार | श्री. श्री संजीव कुमार पांडे, अध्यक्ष |
उत्कृष्ट फार्मर कॉपरेटीव्ह्ज | रंगपूर ग्रुप दूध उत्पादक सहकारी मंडळी, रंगपूर, गुजराथ | श्री राम सिंग रथवा अध्यक्ष |
उत्कृष्ट फार्मर कॉपरेटीव्ह्ज | मुंबई जिल्हा मछिमार मध्यवर्ती सहकारी संघ लिमिटेड- महाराष्ट्र | श्री रामदास सांधे अध्यक्ष |
वैयक्तीक शेतकरी | ||
उत्कृष्ट नाविन्यपूर्ण शेतकरी | गाव आणि पोस्ट: खेडाजिल्हा: अमरोहा (उत्तर प्रदेश) श्री | . सुखवीर सिंग |
उत्कृष्ट नाविन्यपूर्ण शेतकरी | गाव: लडारी, पी. एस. केओतीजिल्हा: दरभंगा (बिहार) | श्री. शंकर झा |
उत्कृष्ट नाविन्यपूर्ण शेतकरी | गाव: मंडलखण, तालुका आणि जिल्हा साजापूर (मध्यप्रदेश) | श्री. शरद भंडावत |
उत्कृष्ट नाविन्यपूर्ण शेतकरी | गाव: बोडादरोब्लॉक: चक्रधर पूर, पश्चिम सिंघभूम (झारखंड ) | श्रीमती जयंती समद |
उत्कृष्ट नाविन्यपूर्ण शेतकरी | गाव: हिरानार (पटेलपारा)जिल्हा: दंतेवाडा (छत्तीसगड) | |
श्रीमती कमला आतमी | ||
राज्य/ केंद्रशासित प्रदेश कृषी सचिव विभाग | ||
उत्कृष्ट राज्य | कृषी सचिव विभाग | कर्नाटक |
उत्कृष्ट एनई राज्य | कृषी विभाग | मिजोराम |
उत्कृष्ट केंद्रशासित प्रदेश | कृषी विभाग | लडाख |