पुणे – क्रेन (NYSE CR) कंपनीने नुकतेच येथील बाणेर परिसरातील एमएजाइल येथे आपले नवे कार्यालय सुरू केले आहे. ‘क्रेन प्रोसेस फ्लो टेक्नॉलॉजीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’तर्फे आयोजित कार्यक्रमात या कार्यालयाचे उद्घाटन ‘क्रेन इंडिया’चे अध्यक्ष हरी जिनागा यांच्या हस्ते नुकतेच झाले.

‘क्रेन’चे पुण्यातील नवे कार्यालय प्रशस्त २५,००० चौरस फुटांवर वसलेले असून अत्याधुनिक सुविधांनी युक्त आहे. तेथून क्रेन इंडियाचे मुख्यालय, कंपनीविषयक कामकाज, विक्री विभाग, क्रेन कंपनी इंडिया सोर्सिंग, ग्लोबल इन्फॉर्मेशन सिक्युरिटी व इंजिनिअरिंग डिझाईन सेंटर यांचे कामकाज चालणार आहे.
यासंदर्भात माहिती देताना ‘क्रेन इंडिया डिझाईन सेंटर’चे संचालक हर्षद कर्वे म्हणाले, की आमच्या अभियांत्रिकी रचना केंद्राने क्रेनला एकस्वक्षम (पेटंटेबल) नवी उत्पादने बाजारात आणण्यासाठी तसेच मूल्य अभियांत्रिकीद्वारे खर्चाचा पुरेपूर वापर करण्यासाठी सक्षम बनवले आहे. आता नव्या प्रशस्त जागेत स्थलांतर झाल्याने तसेच जलद प्रारुपीकरण व इलेक्ट्रॉनिक्स रचना, विकास व चाचण्या यासाठी आधुनिक प्रयोगशाळा मिळाल्याने आम्हाला अभिनव, अद्ययावत व उच्च अभियांत्रिकीयुक्त उत्पादनांचा विकास करणे शक्य होणार आहे.