नवी दिल्ली – एयर इंडिया हा भारतातील आघाडीचा विमानसेवा समूह आणि टाटा सन्म समूहाचा भाग असलेल्या कंपनीने आज एयरबस आणि बोईंगसह पूर्वकरारावर (लेटर्स ऑफ इंन्टेट) सही केल्याचे जाहीर केले. वाइडबॉडी आणि सिंगल आयल विमान संपादन करण्यासाठी हा करार करण्यात आला आहे.
या ऑर्डरमध्ये ४० एयबस A350s, २० बोईंग 787 आणि १० बोईंग 777-9 वाइडबॉडी एयरक्राफ्ट तसेच २१० एयरबस A320/321, निओज आणि १९० बोईंग 737 मॅक्स सिंगल आयल एयरक्राफ्ट यांचा समावेश असेल. A350 एयरक्राफ्टमध्ये रोल्स रॉइस इंजिनचा समावेश असून जीई एयरोस्पेसमध्ये B777/787 इंजिन बसवण्यात आले आहे. सर्व सिंगल आयल एयरक्राफ्टमध्ये सीएफएम इंटरनॅशनल इंजिन्सचा समावेश करण्यात आला आहे.
याप्रसंगी टाटा सन्स आणि एयर इंडियाचे अध्यक्ष श्री. एन. चंद्रशेखरन म्हणाले, ‘एयर इंडिया सुरक्षा, ग्राहक सेवा, तंत्रज्ञान, इंजिनियरिंग, नेटवर्क आणि मनुष्यबळ अशा विविध विभागांचा कायापालट करत आहे. आधुनिक, कार्यक्षम विमानताफा या बदलासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. ही ऑर्डर एयर इंडियाची Vihaan.AI या स्थित्यंतरावर आधारित कार्यक्रमात निश्चित करण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. या कार्यक्रमाअंतर्गत कंपनीने भारतीय आत्मा असलेली जागतिक दर्जाची सेवा प्रवाशांना देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या नव्या विमानांमुळे कंपनीचा विमानताफा आधुनिक होईल आणि जागतिक नेटवर्क लक्षणीय प्रमाणात विस्तारेल. या ऑर्डरमुळे विकास साधणे शक्य होईल व पर्यायाने भारतीय विमानसेवा क्षएत्रातील व्यावसायिकांना करियरच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे भारतीय विमानसेवा यंत्रणेच्या विकासालाही चालना मिळेल.’
नव्या ताफ्यातील पहिले विमान २०२३ च्या अखेरीस उपलब्ध होणार असून २०२५ च्या मध्यानंतर जास्त प्रमाणात विमाने कंपनीच्या ताफ्यात समाविष्ट होतील. दरम्यान एयर इंडियाने भाडेतत्वावर ११ B777 आणि २५ A320 विमाने घेण्यास सुरुवात केली असून त्याद्वारे विमानांचा ताफा आणि नेटवर्कच्या विस्ताराला चालना मिळत आहे.
नव्या विमानात पूर्णपणे नवीन केबिन इंटेरियर असेल, जे एयर इंडियाच्या यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या सध्याच्या वाइडबॉडी B787 आणि B777 विमानांत नव्या सीट्स व विमानाअंतर्गत मनोरंजन सुविधा बसवण्याच्या योजनेशी अनुरूप असेल. पुनर्रचना करण्यात आलेली विमाने २०२४ च्या मध्यावर कंपनीच्या विमानताफ्यात समाविष्ट होतील.
एयर इंडिया समूहात सध्या एयर इंडियाच्या संपूर्ण सेवेचा तसेच दोन कमी शुल्क आकारणाऱ्या तसेच सध्या एकत्रीकरणाच्या प्रक्रियेत असलेल्या उपकंपन्या- एयर इंडिया ए क्सप्रेस व एयर एशिया इंडिया यांचा समावेश आहे. त्यांची पालक कंपनी टाटा सन्सने एयर इंडियाचे पूर्णवेळ विमान सेवा देणाऱ्या एयरलाइन व्हिस्तारामध्ये विलिनीकरण करण्याचा मनोदय व्यक्त केला होती. एयर व्हिस्तारा ही टाटा सन्स व सिंगापूर एयरलाइन्स यांच्यातील संयुक्त भागिदारी कंपनी असून त्यामध्ये एयर व्हिस्ताराचा ५१ टक्के वाटा आहे. सद्यस्थितीत नियामक परवानगीनुसार समूहामध्ये एयर इंडिया ही पूर्णवेळ सेवा देणारी एक विमान कंपनी आणि एयर इंडिया एक्सप्रेस ही एक कमी- शुल्क आकारणारी विमानकंपनी यांचा समावेश असेल.