कोरोना वॉरियर्सचे धैर्य वाढवण्यासाठी देशवासियांनी 9 मिनीटे दिवे आणि मेणबत्त्यांनी परिसर प्रज्वलीत केला, पंतप्रधानांच्या आवाहनाला भारतीयांची साथ

Date:

पुणे-पुण्यातून अनेक ठिकाणी लोकांनी आज रात्री ९ वाजता घरातील लाईट बंद करून टॉर्च,दिवे,मेणबत्त्या लावून कोरोना विरोधातील लढयासाठी आत्मीयबल निर्मितीचा प्रयत्न केला .पुणे महापालिकेतील माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी आपल्या सोसायटीच्या गच्चीत येवून पाहिलेला हा नजारा आणि व्यक्त केलेल्या या भावना ….

कोरोना व्हायरसचा अंधार मिटवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर देशातील नागरिकांनी आज(रविवार) रात्री 9 वाजता 9 मिनीटांसाठी घराच्या सर्व लाइट बंद करुन, दिवे, मेणबत्ती, टॉर्च आणि मोबाईलचा फ्लॅश लावून अंधारावर मात केली. पंतप्रधानांनी लोकांना लक्षात राहावे म्हणून, रविवारी एक ट्वीटदेखील केले होते. यापूर्वी मोदींनी कोरोना संकटावर आपल्या तिसऱ्या संबोधनात म्हटले होते की, आपल्याला 5 एप्रिलला आपल्या महाशक्तिला जागे करायचे आहे

कोरोना संकटावर मोदींनी शुक्रवारी आपल्या तिसऱ्या संबोधनामध्ये 5 एप्रिलला सर्व लाइट बंद ठेवून दिवे, मेणबत्त्या किंवा मोबाइलचा फ्लॅश लावण्याचे आवाहन केले होते. ते म्हणाले होते की, “आपल्याला प्रकाशाची शक्ती दाखवायची आहे. रविवारी 130 कोटी देशवासीयांनी महाशक्ती दाखवायला हवी. घराच्या सर्व लाइट बंद करा आणि घराच्या बालकनी, खिडकी, किंवा छतावर येवून दिवे, मेणबत्त्या, टॉर्च किंवा मोबाइलचा फ्लॅश लावावा. यामुळे घरात असलेल्या लोकांना एकटे वाटणार नाहीत. यादरम्यान सोशल डिस्टंसींगचे पालनही करावे.”

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भारताने बांगलादेशला 5,000 टन डिझेल पाठवले

भारताने आसाममधील नुमालीगढ रिफायनरीतून क्रॉस-बॉर्डर पाइपलाइनद्वारे बांगलादेशला डिझेल पाठवणे...

व्यावसायिक पुरवठा पूर्णपणे बंद झाल्याचे दावे दिशाभूल करणारे, शासनाकडून महत्त्वाचे आवाहन

आखाती देश इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे...

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच रेड्डी, ओबेरॉय यांना डी.लिट:टिळक विद्यापीठाचा 44 वा पदवीप्रदान सोहळा

पुणे- टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत,...