पुणे- इंडिया एक्सक्विसिट पेजेंट चे अॉडिशन्स नुकतेच रॉयल ऑर्किड येथे पार पडले, कल्याणी नगर मधे झालेल्या या अॉडिशन्स मध्ये 100 पेक्षा अधिक महिला सहभागी झाल्या होत्या.ह्या मध्ये सुमारे 30 युवतींची निवड करण्यात आली.
ह्या अॉडिशन्स मध्ये वय, उंची किंवा वजन ह्या गोष्टींची कुठलीही अट नव्हती. येथे केवल टॉलेंट पाहण्यात आले. ह्या वेळी किशोरवयीन पासुन ते 50 वर्षापेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी देखील हे व्यासपीठ खुले होते. ज्यामुळे हे अॉडिशन्स विशेष आणि अद्वितीय असे होते.
रजनी सुब्बा (संस्थापक – संचालक / कंपनी मालक, माजी ब्यूटी क्विन) म्हणाल्या कि ,आज मी येथे पुण्यात आहे कारण पुण्याने मला खूप दिले आहे, माझे पेजेंट्री ट्रेनिंग तायरा-रितीका रतिमा मध्ये केले. आमच्याकडे एक मिसेस डिव्हिजन -मिसेस एक्सक्विसिट इंटरनॉशनल २०१५ , शराया शाहा आणि दोन इंटरनॉशनल फस्ट रनर अप मिस इंडिया एक्सक्विसिट २०१५ इशा अगरवाल आणि मिस इंडया एक्सक्विसिट २०१६, नेओमी शाह आहेत.
यावेळी परीक्षक पॉनल मध्ये, डॉ दीपक सोनवानी (उपाध्यक्ष बॉडी बिल्डींग असोसिएशन, इंडिया), मिसेस अनिंदिता गर्ग (शिक्षक आणि प्रेरणादायी स्पीकर), श्रेया शाह (मिसेस एक्सक्विसिट इंटरनॉशनल 2015), ईशा अगरवाल (मिस इंडिया एक्सक्विसिट 2015) आणि नेओमी शाह (मिसेस इंडिया एक्सक्विसिट 2016) उपस्थित होते.
डॉ. सोनवानी यावेळी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले कि, मी आज खुप आनंदी आहे पहिल्यांदाच मी याप्रकारची प्रतिभा पाहत आहे. रजनी सुब्बा यांचा मी विशेष आभारी आहे कारण त्यांच्यामुळेच मला परीक्षक बणण्याची ही संधी मिळाली आहे. हा शो म्हणजेच महिलांच्या प्रतिभेला चालना देण्यासाठी योग्य व्यासपीठ आहे.


