पुणे-
पुण्याच्या पूर्व भागामध्ये लसीकरण केंद्र जवळ नसल्याने नागरिकांना गाडीखाना, भवानी पेठ, गुरूवार पेठ या केंद्रांवर जावे लागत होते. तेथेही प्रचंड गर्दी होत असल्याने लोकांना लस घेण्यासाठी पहाटे जाऊन नंबर लावावा लागत होता. नागरिकांना होत असलेली गैरसोय दूर करण्यासाठी नगरसेवक अजित दरेकर यांच्या अथक प्रयत्नातून आज शनिवार दि. ५ जून २०२१ रोजी घोरपडी पेठेतील उर्दू शाळा क्र. १३ मध्ये ‘‘कोविड लसीकरण’’ केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
लसीकरण केंद्राची सर्व व्यवस्था पुणे महानगरपालिका लसीकरण केंद्राचे प्रमुख डॉ. कालेकर, डॉ. सय्यद, नर्स नंदिनी बनसोड, वॉर्ड इंजिनिअर सिमरण पिरजादे, आरोग्य निरिक्षक संजय सांळुके यांनी केले.
या प्रसंगी नगरसेवक अरविंद शिंदे, अविनाश बागवे, रविंद्र धंगेकर, दत्ता सागरे, अतुल बेहेरे या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लसीकरण केंद्राचे उद्घाटन झाले. या केंद्रात प्रथम लस घेणाऱ्या ज्येष्ठ महिलेचे स्वागत करून सत्कार करण्यात आला. या उद्घाटन प्रसंगी हेमंत राजभोज, रवि पाटोळे, आप्पा नाईक, मंगेश शेलार, अश्पाक शेख, आयुब पठाण, सईदभाई सय्यद, दादा पाटोळे, सलीम सय्यद, अनिल कुक्कर, पिंताबर खेडेकर, प्रमोद पाटोळे, विशाल गद्रे, नामदेव संकपाळ, उत्तम राऊत, विनोद मोरे, राजू भोंडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक अजित दरेकर यांनी केले होते. तसेच मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन अजित दरेकर, सईद सय्यद, रघुराज दरेकर यांनी सत्कार केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक राजेंद्र भोसले यांनी केले तर आभार प्रदर्शन ओंकार मोरे यांनी केले.

