माऊलीने साजरी केली गुरुपौर्णिमा !
बृहन महाराष्ट्र मंडळाच्या १८ व्या अधिवेशनात, शिकागो महाराष्ट्र मंडळाने, माऊली ही संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांचा जीवनपट उलगडणारी नेत्रदिपक नृत्यनाटीका सादर केली. कल्पना निमकर आणि रवी जोशी यांची पटकथा, प्रख्यात अभिनेत्री अनुपमा धारकर यांच दिग्दर्शन लाभलेली माऊली नृत्यनाटीका प्रेक्षकांना खूपच आवडली. पुण्याचे अद्वैत पटवर्धन यांनी अप्रतीम संगीत ट्रॅक माऊलीसाठी तयार केला आहे. ज्ञानेश्वरांच्या पारंपारीक रचनांना नृत्याचा साज चढवला आहे मधुरा साने यांनी. ज्ञानदेवांनी रेड्यामुखी वेद वदवले, पाठीवर मांडे भाजले आणि भिंत चालवली हे प्रसंग रंगमंचावर सादर करण्याच आव्हान नेपथ्य टीमने अतिशय सम र्थपणे पेलल. बारा बाल कलाकार आणि ३० इतर कलाकारांनी सादर केलेल्या ह्या नाटकाला भरघोस प्रतिसाद मिळाला यांत आश्चर्य नाही. अनुपमा धारकर, रवी जोशी, सुनील मुंडले, रामदास थत्ते, समिर सावंत, अमीत रोग्ये,
शृिधर जोशी, विद्या जोशी, कल्पना निमकर आणी संदिप गाडगीळ, मधुरा साने यांनी निर्मितीसाठी घेतलेले कष्ट प्रयोगातून स्पष्ट झाले यात शंका नाही.





