पुणे : ढोलकीच्या तालावर…सोडा सोडा राया हा नांद खुळा… तुमच्या पुढ्यात बसले मी… चंद्रा चित्रपटातील बान नजंतला घेऊनी अवतरली चंद्रा, नटरंग चित्रपटातील नटरंग उभा अशा एकाहून एक सरस अशा लावण्या व गौळणीच्या सादरीकरणाने रसिकांवर लावणी या लोकप्रिय लोककलेची भुरळ घातली. हावभाव, पदन्यास आणि ढोलकीची थाप यांच्या एकत्रित सादरीकरणाने लावणी या लोककलेचा अप्रतिम कलाविष्कार रसिकांनी अनुभविला. आणि तोही सलग 12 तास!
वर्षा पवार, सोनाली जळगावकर सिनेअभिनेत्री शिवानी कोरे, पुनम कापसे, सुप्रिया जावळे, कावेरी घंगाळे यांनी आपल्या नृत्याने रसिकांची मने जिंकली.
पुणे नवरात्रौ महोत्सवातर्फे शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त गणेश कला क्रिडा रंगमंच येथे सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत सलग बारा तास लावणी महोत्सव पार पडला. यावेळी लावणी महोत्सवाचे सात संचानी सहभाग घेतला होता. शंभरहून अधिक लावण्यवतींनी आपला नृत्यविष्कार दाखवून प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फडले. यावेळी प्रेक्षकांनी शिट्या, टाळ्या व नृत्य करुन लावणीला वन्समोअरची दाद दिली. विचार काय हाय तुमचा… पैलवान आला हो पैलवान आला… बाजीराव मस्तानी चित्रपटातील पिंगा… ज्वानीच्या आगीची मशाल हाती… या लावण्यांच्या सादरीकरणाला रसिकांनी दाद दिली.
वर्षा पवार यांनी सादर केलेल्या हिर्याची अंगठी रुतून बसली, बाई मी लाडाची गं… या लावणीला रसिकांनी विशेष दाद दिली. तर सोनाली जवळगावकर यांनी चंद्रा लावणी सादर करुन प्रेक्षकांची मने जिंकली.
वाजले की बारा…. अप्सरा आली… नटरंग उभा… या नटरंग चित्रपटातील लावण्यांना रसिकांनी भरभरून दाद दिली.
पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा… या बैठकीच्या लावणीच्या सादरीकरणाने आपल्या हावभावातून लावण्यवतींनी रसिकांची मने जिंकली. मी मेनका ऊर्वशी… आणि छत्तीस नखरेवाली… या लावण्यांच्या सादरीकरणाने कार्यक्रमात बहार आणली. भैरवीच्या सुरातील लावणीचे सादरीकरण करण्यात आले. केसात गुंफूणी गजरा तुम्हाला मानाचा मुजरा.. तुमच्या पुढ्यात बसले मी.. तुझ्या उसाला लागल कोल्हा, वाजले की बारा, बाई माझी करंगळी मोडली, आई मला नेसव शालू नवा, अशा ठसकेबाज लावण्यांचे सादरीकरणाने प्रेक्षकांनी टाळ्यांची दाद दिली. तसेच अनेक लावण्यांनी शिट्या आणि वन्समोअरही वसूल केले. महोत्सवाचे वैशिष्ट्ये म्हणले महिलांसाठी बसण्याची व्यवस्थाही करण्यात होती. महिलांची मोठी गर्दी होती. या लावणी महोत्सवात इश्काचा नाद खुळा, लावण्य जल्लोष, जल्लोष अप्सरांचा, लावणी धमाका, अहो नाद खुळा, तुझ्यात जीव रंगला यातील लावणीवती वर्षा पवार, सोनाली जळगावकर, शिवानी कोरे, पुनम कापसे, सुप्रिया जावळे, कावेरी घंगाळे, चतुर्थी पुणेकर, पतंजली पाटील, वैजयंती पाष्टे, वासंती पुणेकर, माया खुटेगावकर, प्रिया मुंबईकर, अर्चना जावळेकर व नमिता पाटील व त्यांच्या सहकार्यांनी तब्बल बारा तास ठसकेबाज लावणी सादर करुन प्रक्षेकांची वाहवा मिळविली.
या सर्व लावणीवती व सह कलाकारांचा सत्कार पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल व सदस्य अमित बागुल यांनी केला. पुणे नवरात्रौ महोत्सवात सलग बारा तासांच्या लावणी महोत्सवाची सुरुवात केली. तेव्हापासून गेली 28 वर्षे रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. तसेच यापासून प्रेरणा घेऊन अनेकांनी लावणी महोत्सव सुरु केले ही आनंदाची बाब आहे, असे आबा बागुल म्हणाले.
प्रारंभी लावणी महोत्सवाचे उदघाटन नारळ वाढवून ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी व अभिनेत्री लिला गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. गांधी यांनी या नवरात्रौत्सवाला शुभेच्छा दिल्या. हा महोत्सव कलाकारांसाठी महत्वाचा असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री व नृत्यगंणा जयमाला इनामदार, लावणी अभ्यासिका आसावरी तारे, पुणे नवरौत्र महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल, पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल, सदस्य अमित बागुल, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, संवादचे अध्यक्ष सुनिल महाजन, मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका व नृत्य दिग्दर्शिका निकीता मोघे, महोत्सवाचे उपाध्यक्ष घनश्याम सावंत, कोषाध्यक्ष नंदकुमार बानगुडे, चिटणीस नंदकुमार कोंढाळकर, सदस्य अमित बागुल, सदस्य रमेश भंडारी, सतिश मानकामे, विलास रत्नपारखी, राजेंद्र बागुल, महेश ढवळे, सागर बागुल, सागर आरोळे, धनंजय कांबळे, अभिषेक बागुल, दुर्गादास देवकर, इम्तियाज तांबोळी, संतोष शिंदे, संतोष पवार, राहुल तौर, गणेश खांदवे, आस्मिन शेख, गणेश पवार यावेळी इत्यादी मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे महोत्सवाचे उपाध्यक्ष घनश्याम सावंत यांनी सुत्रसंचालन केले. हा लावणी महोत्सव रात्री उशीरापर्यंत संपला. लावणी रसिकांनी सारे प्रक्षेगृहा खचाखच भरले होते.

आमचा काळ खुप वेगळा होता. त्याकाळी साजुक तुपातील लावणी होती. आता लावणीचा रंग बदलत गेला असून खुलला आहे. लावणीत होणारा बदलदेखील चांगला आहे. तो झालाही पाहिजे, मात्र लावणीचे सौंदर्यात बदल करु नये. त्याचे ते रुप तसेच टिकवून ठेवण्याची गरज आहे. पूर्वी नववारी नेसूनच लावणी व्हायची. आता ती बदलत आहे. लावणीचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी आपण देखील प्रयत्न करायला हवा. गाण्याचे शब्द, ताल, सौंदर्य व चेहर्यावरील हावभाव लावणीवतींना समजून घेतला पाहिजे. लावणीसारखे सौंदर्य नाही, अशी भावना यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री व नृत्यगंणा जयमाला इनामदार यांनी व्यक्त केली.
लावणी परंपरा पुणे नवरात्रौत्सवात कायम टिकून आहे. यामध्ये पारंपारिक लावण्या झाल्या पाहिजे. लावणी आयटम साँगकडे वळली आहे. लावणीचे रुप बदलण्यात येऊ नाही, अशी भावना यावेळी लावणी अभ्यासक आसावरी तारे यांनी व्यक्त केली.

